२४ नोव्हेंबरपासून विवाहांचा धूमधडाका
By admin | Published: November 16, 2015 03:40 AM2015-11-16T03:40:35+5:302015-11-16T03:40:35+5:30
तुळशीचे लग्न २३ नोव्हेंबर रोजी लागल्यानंतर विवाह मुहूर्तांचा एकच धडाका २४ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या वेळी जुलै महिन्यापर्यंत मुहूर्तांची माळ लांबलेली असून विशेष
ठाणे : तुळशीचे लग्न २३ नोव्हेंबर रोजी लागल्यानंतर विवाह मुहूर्तांचा एकच धडाका २४ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या वेळी जुलै महिन्यापर्यंत मुहूर्तांची माळ लांबलेली असून विशेष म्हणजे मे महिन्यात फक्त एकच मुहूर्त आहे. नोव्हेंबरमध्ये ३, डिसेंबरमध्ये १४, जानेवारी १२, फेब्रुवारीत १४, मार्च १२, एप्रिलमध्ये १४, मे मध्ये १, जुलैमध्ये ५ असे मुहूर्त आहेत. तर, जूनमध्ये एकही मुहूर्त नाही. एकूण ७४ मुहूर्तांपैकी ४४ मुहूर्त गोरज आहेत.
१३ जून २०१५ पासून विवाहाचा धूमधडाका बंद होता. यंदा सिंहस्थ कुंभमेळा, कोकिळा व्रत, अधिकमासामुळे विवाह मुहूर्तच नसल्याचा गैरसमज विवाह इच्छुकांसह नातेवाइकांमध्ये होता.
मात्र, चातुर्मासही त्या कालावधीत आला असल्याने विवाह मुहूर्तावर त्याचा परिणाम नाही. तुळशी विवाहानंतर विवाह मुहूर्तास प्रारंभ होत असतो. यंदा डिसेंबर व फेब्रुवारीत सर्वाधिक १४ मुहूर्त आहेत. मे महिन्यात एकच मुहूर्तआहे.
विवाह मुहूर्त निवडताना अनेक जण सुटीचा विचार करीत असतात. मे महिन्यात शाळांना सुटीच असते. मात्र यंदा वैशाख, ज्येष्ठ महिन्यांत अर्थात मे, जून महिन्यांत शुक्राचा अस्त असल्याने विवाह मुहूर्तच नाही. त्यामुळे मे महिन्यात दाते पंचागात एकच मुहूर्त दिला आहे. (प्रतिनिधी)
यंदा डिसेंबर व फेब्रुवारीत सर्वाधिक
१४ मुहूर्त आहेत. मे महिन्यात एकच मुहूर्त आहे.
मुहूर्त निवडताना अनेक जण सुट्टीचा विचार करीत असतात. मे महिन्यात शाळांना सुटीच असते. मात्र यंदा वैशाख, ज्येष्ठ महिन्यांत अर्थात मे, जून महिन्यांत शुक्राचा अस्त असल्याने विवाह मुहूर्तच नाही. त्यामुळे मे महिन्यात दाते पंचांगात एकच मुहूर्त दिला आहे.
विवाह मुहूर्त याप्रमाणे
नोव्हेंबर- २४, २६, २७; डिसेंबर- ४, ६, ७, ८, १४, १५, १६, २०, २१, २४, २५, २९, ३०, ३१; जानेवारी- १, २, ३, ४, १७, २०, २१, २६, २८, २९, ३०,३१; फेब्रुवारी- १, २, ३, ४, ५, ११, १३, १६, १७, २२, २४, २५, २७, २८; मार्च- १, ३, ५, ६, ११, १४, १५, २०, २१, २५, २८, ३१.; एप्रिल- १, २, ४, १६, १७, १९, २२, २३, २४, २६, २७, २९, ३०.; मे- १, जुलै- ७, १०, ११, १२, १३