काचबिंदू टाळण्यासाठी सप्ताहाचे आयोजन
By admin | Published: March 4, 2017 02:56 AM2017-03-04T02:56:27+5:302017-03-04T02:56:27+5:30
पनवेल येथील लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटच्या वतीने १२ ते १८ मार्च या कालावधीत काचबिंदू सप्ताहाचे आयोजन करण्यात आले
कळंबोली : पनवेल येथील लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटच्या वतीने १२ ते १८ मार्च या कालावधीत काचबिंदू सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर रविवार, ५ मार्च रोजी सकाळी नऊ वाजता कामोठे येथे ‘जीवनातील अंधकार रोखा’ हा संदेश देण्याकरिता रॅली काढण्यात येणार आहे. या उपक्र माचे लोकमत माध्यम प्रायोजक आहे.
काचबिंदू हा डोळ्यांचा एक विकार आहे. त्याचे निदान त्वरित झाल्यास योग्य औषधोपचार होऊ शकतात. याविषयी जनजागृती करण्यासाठी रविवारी रॅली काढण्यात येणार असून सुषमा पाटील विद्यालयाच्या प्रांगणात समारोप करण्यात येणार आहे. यामध्ये सुषमा पाटील ज्युनिअर कॉलेज, शंकरराव चव्हाण क्र ांती स्कूल, रामशेठ ठाकूर न्यू इंग्लिश स्कूल, भारती विद्यापीठ, एमजीएम नर्सिंगचे विद्यार्थी सहभाग नोंदवणार आहेत. या वेळी सुप्रसिध्द नेत्ररोग तज्ज्ञ तथा लक्ष्मी इन्स्टिट्यूटचे प्रमुख डॉ. सुहास हळदीपूरकर, डॉ. रिता धामणकर यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. (वार्ताहर)