वीकेण्डला तलाव क्षेत्रात पावसाची धम्माल, तीन दिवसांत ३२ दिवसांचा जलसाठा वाढला
By admin | Published: July 4, 2016 07:47 PM2016-07-04T19:47:23+5:302016-07-04T19:47:23+5:30
मुंबईत कोसळणाऱ्या धो धो पावसाने तलाव क्षेत्रातही बरसू लागला आहे़ वीकेण्डलाच तलावांमध्ये जोरदार हजेरी लावत पावसाने ३२ दिवसांचा जलसाठा वाढविला आहे़
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ मुंबईत कोसळणाऱ्या धो धो पावसाने तलाव क्षेत्रातही बरसू लागला आहे़ वीकेण्डलाच तलावांमध्ये जोरदार हजेरी लावत पावसाने ३२ दिवसांचा जलसाठा वाढविला आहे़ एकूण जलसाठ्याच्या १५ टक्केच हा साठा आहे़ मात्र पाणीटंचाईच्या काळात ही वाढही दिलासा देणारी आहे़ जून महिना संपत आला तरी पावसाळी ढग तलाव क्षेत्रात फिरकत नव्हते़ त्यामुळे तलावांची पातळी दिवसेंदिवस खालवत होती़ मुंबईत पाऊस जोरदार असला तरी तलाव क्षेत्र मात्र कोरडीच राहत होती़ मात्र वीकेण्डला हजर झालेल्या पावसाने तलाव क्षेत्रातील वातावरणच बदलून टाकले़ जोरदार बॅटिंग करीत पावसाने तलाव क्षेत्रातील जलसाठा २० ते ३० हजार दशलक्ष लीटरने वाढविला़ तीन दिवसांमध्ये तलावांत तब्बल एक लाख १७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा वाढला़ यामुळे ३२ दिवसांचे जलसाठा तयार झाला आहे़ वर्षभर आवश्यक जलसाठ्याच्या हा १५ टक्केच साठा असल्याने पाणीकपात मात्र कायम राहणार आहे़.
जलसाठ्याची आकडेवारी मीटर्समध्ये तलाव-कमाल किमान आजची स्थितीआजचा पाऊस(मि़मी़)
मोडक सागर १६३़१५१४३़२६ १४५़१४ ९७़६० तानसा१२८़६३ ११८़८७ १२२़१३ ११०़०० विहार८०़१२ ७३़९२ ७६़७६ ९०़०० तुळशी१३९़१७ १३१़०७ १३५़०६ ९३़०० अप्पर वैतरणा ६०३़५१५९५़४४ ५९४़८२ ११५ भातसा१४२़०७ १०४़९० ११३़३० ११८ मध्य वैतरणा २८५़००२२०़०० २४७़१४ १६२़३०
एकूण २०१६ २२७८२७ दशलक्ष लीटर २०१५- ३२६२२३ दशलक्ष लीटर
मुंबईला दररोज ३७५०दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो़ गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यापासून पाणीकपात सुरु असल्याने ३२५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा दररोज होत आहे़ मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे़.