बालकाचे वजन ‘एसएमएस’द्वारे कळणार
By admin | Published: September 19, 2014 02:34 AM2014-09-19T02:34:01+5:302014-09-19T02:34:01+5:30
कमी वजनाच्या बालकाची माहिती आई-वडील व अधिका:यांना ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात येणार आहे. राज्यातील हा पहिला प्रकल्प आहे.
Next
ज्ञानेश दुधाडे -अहमदनगर
अंगणवाडीत जाणा:या मुलापासून ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे कुपोषण टाळण्यासाठी त्यांचे वजन माता-पित्याला कळविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाने वजन संनियंत्रण प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. कमी वजनाच्या बालकाची माहिती आई-वडील व अधिका:यांना ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात येणार आहे. राज्यातील हा पहिला प्रकल्प आहे.
जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागातर्फे कुपोषणमुक्तीसाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. नगरचा डिजिटल अंगणवाडी प्रकल्प राज्यस्तरावर पोहोचला आहे.
आता शाश्वत कुपोषणमुक्तीसाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीतून नावीन्यपूर्ण योजनेतून अंगणवाडीत येणा:या सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचे वजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कमी वजन असणा:या बालकांची माहिती संबंधित माता-पिता, अंगणवाडी सेविका, बालविकास प्रकल्प अधिकारी, उपमुख्य
कार्यकारी अधिकारी महिला बालकल्याण आणि मुख्य कार्यकारी अधिका:यांना मोबाइलच्या माध्यमातून एसएमएसद्वारे मिळणार आहे.
महिला आणि बालकल्याण विभागाने साडेतीन हजार इलेक्ट्रॉनिक वजनकाटे खरेदी केले असून, त्यात वय आणि उंचीनुसार वजनाची माहिती फिड करण्यात आलेली आहे.
संबंधित बालकाचे वजन केल्यानंतर ते अधिक आहे की कमी आहे? तो कुपोषणाला बळी पडण्याची शक्यता आहे का? याची माहिती त्या यंत्रत संकलित होणार आहे. त्यानंतर ती माहिती वजनकाटय़ातून तालुक्याच्या ठिकाणी प्रकल्प कार्यालयात आणि तेथून इंटरनेटच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर तालुका, गाव आणि बालकाच्या नावासह संकलित होणार आहे.
जिल्हा परिषदेने हा प्रकल्प पायलट प्रोजेक्ट तत्त्वावर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. माता-पित्याला आपल्या बाळाचे वजन कमी आहे की अधिक, हे कळणार आहे.
- शैलेश नवाल, सीईओ, जिल्हा परिषद
कुपोषित बालकांची माहिती ऑनलाइन पाहता येणार आहे. जिल्ह्यात 4 हजार 8क्क् अंगणवाडय़ा आहेत. त्यातील साडेतीन हजार अंगणवाडय़ांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. 15 ऑक्टोबरपासून प्रकल्प कार्यान्वित होईल.