CoronaVirus News: 'त्या' मजुरांच्या जागी भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्यास स्वागतच, पण...; फडणवीसांनी सांगितली अडचण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 07:57 PM2020-05-27T19:57:31+5:302020-05-27T19:59:06+5:30

CoronaVirus News: डायमंड इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात बंगालचा कामगार काम करतो. म्हणजे...

welcome to get jobs maharashtrian youngsters in place of 'those' laborers, but ...by devendra Fadnavis vrd | CoronaVirus News: 'त्या' मजुरांच्या जागी भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्यास स्वागतच, पण...; फडणवीसांनी सांगितली अडचण

CoronaVirus News: 'त्या' मजुरांच्या जागी भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्यास स्वागतच, पण...; फडणवीसांनी सांगितली अडचण

Next

मुंबई- महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना स्थलांतरित मजुरांच्या जागी स्थान मिळाल्यास मला आनंदच, मी त्याचं स्वागत केलेलं आहे. त्यासाठी तरुणांना तसं कौशल्यही द्यावं लागेल, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. डायमंड इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात बंगालचा कामगार काम करतो. तो जर निघून गेला तर महाराष्ट्रातील कुठल्या कामगाराला ते कौशल्य लगेच आत्मसाद करता येणार आहे. ते कौशल्य त्याला आधी शिकावं लागेल, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.

देशातील ३३ टक्के रुग्ण ज्या राज्यात आहेत. देशातील ४० टक्के मृत्यू ज्या राज्यात झालेले आहेत. त्या राज्याचे मंत्री आपली पाठ थोपटून घेत आम्ही कसं उत्तम काम करतोय हे सांगत असल्याची टीकाही ठाकरे सरकारवर फडणवीसांनी केली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात उत्तम काम झालेलं सांगत असलेल्या महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनाही फडणवीसांनी खडे बोल सुनावले आहेत. मुंबईत टेस्टची संख्या कमी करण्यात आली आहे. देशात टेस्ट केल्यानंतर एकूण पाच टक्के रुग्ण पॉझिटिव्ह निघतात आणि महाराष्ट्रात ते १३ ते साडेतेरा टक्के पॉझिटिव्ह रुग्ण सापडतात. मे महिन्यात त्याचं प्रमाण ३२ टक्के करण्यात आलं आहे. मग कशाच्या आधारावर आपली पाठ थोपटण्याचं काम ठाकरे सरकारच्या वतीनं चाललं आहे. हे मला खरोखरंच समजत नाही, असं म्हणत फडणवीसांनी टीकास्त्र सोडलं आहे.

अशा प्रकारच्या एकत्रित पत्रकार परिषदा घेण्याऐवजी मुंबईत लोकांना अँब्युलन्स न मिळाल्यामुळे लोकांचा मृत्यू होतोय, त्यासंदर्भात तुम्ही काय करणार आहात ते सांगा, असं आव्हानंच देवेंद्र फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांना दिलं आहे. मुंबईत लोकांचं टेस्टिंग होत नाही, यासंदर्भात काय करणार आहोत ते सांगा. केवळ फेकाफेक करायची आणि खोटी आकडेवारी द्यायची यानं महाराष्ट्राचं भलं होणार नाही. महाराष्ट्राच्या जनतेला त्यांचा मित्र कोण आणि शत्रू कोण हे स्पष्टपणे माहीत आहे. सरकारला मदत  करायची आजही आमची भूमिका आहे. पण अशा प्रकारे सरकारकडून फेकाफेक केली जात असेल, तर त्याचा पर्दाफाश आम्हाला करावाच लागेल, असंही फडणवीस म्हणाले आहेत. 

हेही वाचा

CoronaVirus News: ...अन् फडणवीस पुन्हा आले; ठाकरे सरकारच्या 'त्या' दाव्यांची चिरफाड करून गेले

CoronaVirus News: विरोधकांकडून सरकारला बदनाम करायचं काम; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल

CoronaVirus News :मोदींच्या भारताकडे कोणी डोळे वटारून पाहू शकत नाही, भाजपाचा राहुल गांधींवर निशाणा

भारत-चीन तणाव वाढला! युद्धाच्या तयारीला वेग द्या; शी जिनपिंग यांचे सेनेला आदेश

बिनकामी माणसंच सरकार पाडण्याचा विचार करू शकतात, पवार फडणवीसांवर भडकले

Web Title: welcome to get jobs maharashtrian youngsters in place of 'those' laborers, but ...by devendra Fadnavis vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.