पुण्याच्या अभिषेकला गुगलची आॅफर
By admin | Published: November 25, 2015 01:17 AM2015-11-25T01:17:18+5:302015-11-25T01:17:18+5:30
आयआयटी खरगपूर येथे कॉम्प्युटर सायन्सच्या अखेरच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या पुण्यातील अभिषेक पंत याला ‘गुगल’ कडून नोकरीची आॅफर देण्यात आली आहे.
पुणे : आयआयटी खरगपूर येथे कॉम्प्युटर सायन्सच्या अखेरच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या पुण्यातील अभिषेक पंत याला ‘गुगल’ कडून नोकरीची आॅफर देण्यात आली आहे. त्याला तब्बल दोन कोटी रुपयाचे वार्षिक पॅकेजची देऊ केले आहे. कॅलिफोनिर्यात ‘गुगल’ मध्ये तीन महिन्यांची इंटनशिप पूर्ण केल्यानंतर त्याची निवड झाली आहे.
अभिषेकचा जन्म अमेरिकेत झाला. आपल्या कुटुंबासह तो पुण्यात दाखल झाला. त्याने सीबीएससी शाळेत दहावी पर्यंत शिक्षण घेतले. दहावीमध्ये त्याने प्रथम येण्याचा मानही पटकवला. त्यानंतर औध येथील डीएव्ही शाळेत अकरावी - बारावीचे शिक्षण घेतले. त्याला वेळोवेळी शिक्षकांचे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाले.
अभिषेकचे वडील राजीव पंत म्हणाले, आपल्या मुलांच्या शिक्षणाची आणि भविष्याची आम्ही चिंतीत होते. भारतीय शिक्षण पद्दतीत तो स्वत:ला मिसळून घेईल का? याबाबत शंका होती. मात्र,अभिषेकने भारतीय शिक्षण पध्दतीला जुळवून घेतले. दहावीत तब्बल ९७.६ टक्के गुण मिळवले. अभिषेक केवळ पुस्तकात रमणारा मुलगा नाही. त्याला बास्केटबॉल खेळायला खूप आवडते. कॉलेजच्या संघातही तो खोळला आहे. आयआयटीचे शिक्षण घेत असताना त्याने गुगलवर काही गेम अपलोड केल्या होत्या. त्याला विविध देशातून पाच हजारापेक्षा अधिक लाईक्स मिळाल्या होत्या. त्याच्यासाठी पगार महत्त्वाचा नाही तर आपल्या आवडीच्या सॉफ्टवेअर प्रोग्रामिग क्षेत्रात काम करण्यासाठी मिळणे, ही त्याच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे.