रेल्वेतही होणार विमानाप्रमाणेच प्रवाशांचे स्वागत

By admin | Published: October 3, 2016 05:42 AM2016-10-03T05:42:58+5:302016-10-03T05:42:58+5:30

राजधानी एक्स्प्रेसमध्ये तुमचे स्वागत आहे... तुमचा प्रवास सुखाचा होवो...’ अशा प्रकारचे स्वागत लवकरच पश्चिम रेल्वेवरील राजधानी व दुरान्तो ट्रेनमध्ये होईल.

Welcome to the Railways as per the airline | रेल्वेतही होणार विमानाप्रमाणेच प्रवाशांचे स्वागत

रेल्वेतही होणार विमानाप्रमाणेच प्रवाशांचे स्वागत

Next


मुंबई : ‘नमस्कार राजधानी एक्स्प्रेसमध्ये तुमचे स्वागत आहे... तुमचा प्रवास सुखाचा होवो...’ अशा प्रकारचे स्वागत लवकरच पश्चिम रेल्वेवरील राजधानी व दुरान्तो ट्रेनमध्ये होईल. विमानात होणाऱ्या स्वागताप्रमाणेच एक्स्प्रेस ट्रेनमध्येही अशा प्रकारची सुविधा पश्चिम रेल्वे व आयआरसीटीसीने देण्याचा निर्णय घेतला आहे.
जास्तीतजास्त प्रवाशांना आकृष्ट करण्यासाठी प्रवाशांना उत्तम व चांगल्या सुविधा कशा पुरवल्या जातील, याकडे रेल्वेकडून विशेष लक्ष दिले जात आहे. त्यासाठी पहिला व वेगळा प्रयोग राजधानी व दुरान्तोसारख्या ट्रेनमध्ये केला जाणार आहे.
राजधानी व दुरोन्तोच्या एसी प्रथम तसेच द्वितीय श्रेणीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले जाईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आरती सिंह परिहार यांनी दिली. (प्रतिनिधी)
>असे करणार आकृष्ट
विमानातील सेवेप्रमाणेच या दोन ट्रेनमध्ये सुविधा दिली जाईल. ट्रेनमधील प्रथम श्रेणीतील प्रवाशांच्या स्वागतासाठी गाडीचे अधीक्षक, सेवा कर्मचारी आणि द्वितीय श्रेणीतील प्रवाशांच्या स्वागतासाठी सेवा कर्मचारी व तिकीट निरीक्षक असतील.
प्रवास सुरू होण्यापूर्वी पाच मिनिटे आधी प्रवाशांना ते स्वत:ची ओळख करून देतील आणि पाण्याची बाटली तसेच तोंड पुसण्यासाठी टॉवेल देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर काही वेळातच प्रवाशांना खाद्यपदार्थांची सूची देण्यात येईल. ट्रेनमध्ये प्रवाशांच्या स्वागतासाठी एक खास उद्घोषणा तयार करण्यात येत असल्याचे परिहार म्हणाले.

Web Title: Welcome to the Railways as per the airline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.