श्री णमोकार तीर्थावर पाषाणाचे जल्लोषात स्वागत, मंत्रोच्चरात ३५१ टनांच्या पाषाणाचे पूजन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 05:34 AM2021-06-06T05:34:37+5:302021-06-06T05:35:01+5:30

श्री देवनंदीजी महाराज यांनी मंत्रोच्चार करत पूजाविधी केला. त्यानंतर प्रीतम शहा (पळसदेवकर), प्रकाश शेठी व विजय कासलीवाल (नांदेड) या परिवाराच्यावतीने पूजन करण्यात आले.

Welcome to Shri Namokar at the function in Nashik | श्री णमोकार तीर्थावर पाषाणाचे जल्लोषात स्वागत, मंत्रोच्चरात ३५१ टनांच्या पाषाणाचे पूजन

श्री णमोकार तीर्थावर पाषाणाचे जल्लोषात स्वागत, मंत्रोच्चरात ३५१ टनांच्या पाषाणाचे पूजन

Next

चांदवड (नाशिक) : राष्ट्रसंत श्री देवनंदीजी महाराज यांच्या प्रेरणेने मालसाणे येथे निर्मित श्री णमोकार तीर्थावर ४६ फूट उंच अरिहंत भगवान यांच्या खड्गासन स्थितीतील मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारा भव्य असा ३५१ 
टनाचा पाषाण १६४ चाकांच्या ट्रकमधून शनिवारी मालसाणे येथे दाखल झाला. तीर्थावर पाषाणाचे आगमन होताच जैन बांधवांनी वाजतगाजत आचार्यश्रींचा जयघोष करत स्वागत केले.
श्री देवनंदीजी महाराज यांनी मंत्रोच्चार करत पूजाविधी केला. त्यानंतर प्रीतम शहा (पळसदेवकर), प्रकाश शेठी व विजय कासलीवाल (नांदेड) या परिवाराच्यावतीने पूजन करण्यात आले. मांगीतुंगीजी ट्रस्टचे अध्यक्ष सुमेर काला, रवींद्र पाटणी यांनी पाषाणावर पुष्पवृष्टी केली, तर संतोष पेंढारी (नागपूर), तीर्थरक्षा कमिटी संजय पापडीवाल, ललित पाटणी यांच्याहस्ते महाआरती करण्यात आली.
शैलेश कासलीवाल, पवन पाटणी, मनोज शहा, रवींद्र पहाडे, पारस लोहाडे, वर्धमान पांडे, राजेंद्र कासलीवाल, मनोज कासलीवाल, प्रवीण संचेती यांच्याहस्ते आचार्य कुंथुसागर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आचार्य श्री देवनंदीजी महाराज व नवीन नंदिजी महाराज यांचे प्रज्ञाश्रमन बहुमंडलच्यावतीने पादप्रक्षालन करण्यात आले. सूत्रसंचालन प्रवीण लोहाडे यांनी केले, तर ब्रह्मचारी वैशालीदीदी यांनी आभार मानले.

मान्यवरांच्या ऑनलाइन शुभेच्छा
याप्रसंगी केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल, खासदार कृपाल तुमाणे, जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ऑनलाइन भाषणात शुभेच्छा दिल्या व णमोकार तीर्थावर भविष्यात लागणाऱ्या कार्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. महावीर गंगवाल, अनिल जमगे, प्रमोद कासलीवाल, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, नवीन पहाडे, विनोद लोहाडे, जयकुमार कासलीवाल यांच्याहस्ते दीपप्रज्वलन झाले.

Web Title: Welcome to Shri Namokar at the function in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक