सुशांत प्रकरणी SM रॅकेट विरोधी मुंबई पोलिसांच्या कारवाईचे स्वागत - सचिन सावंत

By Ravalnath.patil | Published: October 6, 2020 01:54 PM2020-10-06T13:54:32+5:302020-10-06T14:04:50+5:30

Sachin Sawant : मुंबई पोलीस आणि राज्य सरकार यांची बदनामी करण्यासाठी तब्बल ८० हजार अकाऊंट्स नव्याने उघडली गेली आणि ती बनावट होती.

Welcoming the action of Mumbai Police against SM racket in Sushant case - Sachin Sawant | सुशांत प्रकरणी SM रॅकेट विरोधी मुंबई पोलिसांच्या कारवाईचे स्वागत - सचिन सावंत

सुशांत प्रकरणी SM रॅकेट विरोधी मुंबई पोलिसांच्या कारवाईचे स्वागत - सचिन सावंत

googlenewsNext

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलीस आणि आयुक्त परमबीर सिंह यांच्या बदनामीसाठी सोशल मीडियात तब्बल ८० हजार बनावट अकाऊंट्स उघडण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आयुक्त परमबीर सिंह यांनी मुंबई सायबर सेलला चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. तसेच, याप्रकरणी मुंबई सायबर सेलकडून माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

मुंबई पोलिसांच्या या निर्णयाचे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी स्वागत केले असून लवकरच या SM रॅकेटचा छडा लावला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. सचिन सावंत यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. "सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सोशल मिडिया रॅकेट विरोधी मुंबई पोलिसांच्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो. लवकरच या बनावट सोशल अकाउंट्सचा खुलासा करू, ज्याला भाजपाचा IT विभागाने बनवले आहे. ज्यांचा उद्देश हा महाराष्ट्राला बदनाम करणे होता." असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन मुंबई पोलीस आयुक्तांची प्रतीमा मलिन करण्यात आली. त्यांच्याविरोधात अश्लाघ्य भाषेचा वापर केला आणि मुंबई पोलीस दलाला बदनाम करण्यात आले. याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत अनेक सोशल मीडिया अकाऊंट आणि बनावट अकाऊंटवर दोन गुन्हे दाखल केले आहे, अशी माहिती सायबर सेलच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी दिली आहे.

मुंबई पोलीस आणि सरकारच्या बदनामीसाठी ८० हजार फेक अकाऊंट्स
सायबर सेलने दिलेल्या अहवालानुसार, मुंबई पोलीस आणि राज्य सरकार यांची बदनामी करण्यासाठी तब्बल ८० हजार अकाऊंट्स नव्याने उघडली गेली आणि ती बनावट होती. एरव्ही मुंबई पोलिसांबद्दल कोणी काही बोलताना दिसत नाही. कारण मुंबई पोलिसांनी आपल्या कामगिरीने जगात लौकिक मिळवला आहे. पण सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर लगेचच १४ जूनपासून ही अकाऊंट्स उघडली गेली असे अहवाल म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी तपास करण्याचे आदेश सायबर सेलला दिले होते. त्यानुसार सध्या दोन गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
 

Web Title: Welcoming the action of Mumbai Police against SM racket in Sushant case - Sachin Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.