सुसज्ज चित्रनगरी हीच मानेंना आदरांजली
By admin | Published: September 2, 2015 01:00 AM2015-09-02T01:00:15+5:302015-09-02T01:00:15+5:30
अनंत माने हे मराठी चित्रपटसृष्टीला प्रभातकाळी पडलेले स्वप्न होते. पडत्या काळातही मराठी चित्रपटांना जगवणाऱ्या माने यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय मराठी चित्रपट
कोल्हापूर : अनंत माने हे मराठी चित्रपटसृष्टीला प्रभातकाळी पडलेले स्वप्न होते. पडत्या काळातही मराठी चित्रपटांना जगवणाऱ्या माने यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची स्थापना झाली. तसेच कोल्हापुरात चित्रनगरी उभी राहिली; पण आता ती कोमात आहे. या चित्रनगरीला ऊर्जितावस्था आणून येथील मातीत रूजलेला चित्रपट व्यवसाय जोमाने चालवणे हीच अनंत मानेंना खरी आदरांजली ठरणार आहे, असे मत व्यक्त करत चित्रपट व्यावसायिकांनी सुसज्ज चित्रनगरीचा निर्धार केला.
दिग्दर्शक अनंत माने यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्यावतीने मंगळवारपासून अनंत माने स्मृती चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या उद्घाटनपर कार्यक्रमात हा संकल्प करण्यात आला. व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर, उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, कार्यवाह सुभाष भुरके, अनंत माने यांचे चिरंजीव चंद्रकांत माने, मुलगी वैजयंती भोसले, कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी, दिग्दर्शक भास्कर जाधव आदी उपस्थित होते.