चक्क ... सीमकार्डमुळे लागला म्हैस चोरीचा छडा
By Admin | Published: August 23, 2016 09:25 PM2016-08-23T21:25:16+5:302016-08-23T21:25:16+5:30
संपत तातोबा यादव यांची ४० हजाराची म्हैस लंपास करणाऱ्या चोरट्याला जेरबंद करण्यात विटा पोलिसांना मंगळवारी यश आले. म्हैस चोरतेवेळी चोरट्याचे मोबाईल सीमकार्ड घटनास्थळी पडल्याने
ऑनलाइन लोकमत
विटा : कमळापूर (ता. खानापूर) येथील संपत तातोबा यादव यांची ४० हजाराची म्हैस लंपास करणाऱ्या चोरट्याला जेरबंद करण्यात विटा पोलिसांना मंगळवारी यश आले. म्हैस चोरतेवेळी चोरट्याचे मोबाईल सीमकार्ड घटनास्थळी पडल्याने, त्यावरून पोलिसांना त्याच्यापर्यंत पोहोचता आले. याप्रकरणी कडेगाव तालुक्यातील खेराडे-विटा हे मूळ गाव असलेल्या व सध्या पलूस तालुक्यातील खटाव गावात सासुरवाडीत राहणाऱ्या राहुल तुकाराम मदने (वय २६) या चोरट्यास अटक करण्यात आली.
कमळापूर येथील संपत यादव यांचा वडाच्या मळ्याजवळ आळसंद रस्त्यावर जनावरांचा गोठा आहे. दि. १६ आॅगस्ट रोजी मध्यरात्री संशयित राहुल मदने खटाव (ता. पलूस) येथील छोटा टेम्पो (क्र. एमएच-१०-बीआर-१७९८) भाड्याने घेऊन कमळापुरात आला. त्याने गोठ्यातील म्हैस व रेडकू टेम्पोत घातले. त्यावेळी त्याच्या मोबाईलचे सीमकार्ड तेथे पडले. यातील म्हैस त्याने नांद्रे (ता. मिरज) येथील त्याच्या नातेवाईकास विकली.
म्हैस चोरीला गेल्याचा प्रकार म्हैशीचे मालक यादव यांच्या निदर्शनास आल्यानंतर, त्यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता, टेम्पोच्या टायरच्या खुणा दिसल्या. त्यावेळी त्यांना तेथे मोबाईलचे सीमकार्डही सापडले. यादव यांनी विटा पोलिसांत फिर्याद देऊन सापडलेले सीमकार्ड पोलिसांना दिले.
पोलिस निरीक्षक मोहन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस फौजदार शिवाजी बोते, हवालदार अमोल पाटील, मनोज जाधव, अजय लांडगे यांनी या सीमकार्डच्या आधारे तपास करून मदने यास मंगळवारी अटक केली. त्याला विटा न्यायालयात हजर केले असता, दि. २५ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.
आणखी तीन म्हैशी चोरल्याची कबुली
संशयित राहुल मदने खटाव येथे सासुरवाडीत राहण्यास आहे. त्यामुळे तेथील लोक त्याला ह्यजावईह्ण म्हणून ओळखतात. त्याला गजाआड केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने यापूर्वी कडेपूर येथील दोन व खेराडे-विटा येथील एक अशा तीन म्हैशी चोरल्याची कबुली दिली.