कंगना भाजपा किंवा रिपाईत आल्यास स्वागत; रामदास आठवलेंनी सांगितला चर्चेचा तपशील

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 07:56 PM2020-09-10T19:56:07+5:302020-09-10T19:58:44+5:30

शिवसेनेने धमकी दिल्यानंतर रामदास आठवलेंनी कंगना राणौतला मुंबईत सुरक्षा देण्याची घोषणा केली होती. यानंतर आज त्यांनी कंगनाची भेट घेतली.

we'll welcome kangana Ranaut if she joins BJP or RPI : Ramdas Athavle | कंगना भाजपा किंवा रिपाईत आल्यास स्वागत; रामदास आठवलेंनी सांगितला चर्चेचा तपशील

कंगना भाजपा किंवा रिपाईत आल्यास स्वागत; रामदास आठवलेंनी सांगितला चर्चेचा तपशील

Next

मुंबई : मुंबईतील ऑफिस तोडल्याप्रकरणी आणि मुंबईत सुरक्षा दिल्यानंतर आरपीआयचे नेते आणि राज्यसभा खासदार रामदास आठवले यांनी आज कंगना राणौतची तिच्या घरी भेट घेतली. यावेळी कंगनाने आपल्याला राजकारणात रुची नसल्याचे सांगितल्याचे आठवले म्हणाले. 


राजकारणात रुची नसली तरीही समाज एकत्र राहण्यामध्ये असल्याचे कंगनाने आठवलेंना सांगितले. कंगना तिच्या आगामी चित्रपटात एका दलित मुलीची भूमिका साकारत आहे. जातीपातीची सिस्टिम नष्ट व्हावी असे या चित्रपटाचे कथानक आहे, असे आठवले म्हणाले. 




जोपर्यंत चित्रपटांमध्ये काम करत आहे तोपर्यंत कंगनाला राजकारणात रुची नाही, असे कंगनाने स्पष्ट सांगितल्याचे आठवले म्हणाले. तसेच पुढे कंगना भाजपा किंवा आरपीआयमध्ये आल्यास तिचे स्वागत करू, असेही आठवलेंनी सांगितले. 


दरम्य़ान, कंगनाच्या आईने आज मोठी घोषणा केली आहे. कंगनाला वाय प्लस सुरक्षा देऊन आणि हिमाचलच्या जयराम ठाकूर सरकारनेही सुरक्षा पुरविल्याने आम्ही भाजपाचे झालो आहोत, असे वक्तव्य कंगनाची आई आशा राणौत यांनी केले आहे. कंगनाच्या मूळ घरी भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते गेले होते. तेव्हा आशा यांनी हे वक्तव्य केले आहे. भाजपाच्या नेत्यांनी त्यांना आम्ही कंगनासोबत असल्याचे म्हटले आहे. तसेच घाबरण्याची आवश्यकता नाही. हिमाचलच्या बेडर मुलीचे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही, असे आश्वासन दिले. यावर कंगनाच्या आईने मोदी सरकार आणि हिमाचल सरकाचे आभार व्यक्त केले. ''आमचे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेससोबत होतो. मात्र, मोदी सरकारने आमचे हृदय जिंकले आहे. यामुळे आता आम्ही पूर्णपणे भाजपाचे झालो आहोत.''




कंगनालाही राजकीय पार्श्वभूमी 
कंगनालाही राजकीय पार्श्वभूमी आहे. तिचे पणजोबा सरजू सिंह गोपालपूरचे आमदार होते. त्या आधीपासून त्यांचे कुटुंबीय काँग्रेसी विचारधारेचे समर्थ राहिले आहे. मात्र, कंगना गेल्या काही काळापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती करते. यामुळे कंगना पुढील काळात भाजपात दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. तिच्या आईनेही आज तसेच संकेत दिले आहेत. शांता कुमार यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून कंगनाला सुरक्षा पुरविण्याची मागणी केली आहे. 


 

२ कोटींचे नुकसान

महाराष्ट्र सरकारने उचललेल्या पावलावरून कंगना नाराज असून ते ऑफिस तिच्यासाठी स्वप्नांचे ऑफिस होते. वकिलाने हे देखील सांगितले की, महापालिकेने ही कारवाई कोणाच्या तरी सांगण्यावरून केलेली आहे. कंगनाच्या ऑफिसचे जेवढे नुकसान झाले आहे त्याची एकूण रक्कम 2 कोटींच्या घरात जाते. तसेच कंगनाने उच्च न्यायालयात बीएमसीने बेकायदा कारवाई केल्याचे अॅफिडेव्हीट दिले आहे. बीएमसी अधिकाऱ्यांच्याविरोधात कारवाई करणार असे तिचे म्हणणे आहे. आज तकने सिद्दीकी यांची मुलाखत घेतली आहे.

रॅपीड अँटीजेन टेस्ट निगेटीव्ह आल्यास पुन्हा आरटी-पीसीआर टेस्ट होणार; केंद्र सरकारचे आदेश

तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली; जीवन प्राधिकरणात रूजू होण्याआधीच निघाले आदेश

दोन कोटींचे नुकसान; कंगना मुंबई महापालिकेवर गुन्हा दाखल करणार

नशीब म्हणतात! लॉकडाऊनमध्ये घर सफाईवेळी जॅक'पॉट' लागला; किंमत ऐकूनच भिरभिरला

मुकेश अंबानींना तगडा भिडू मिळणार; 'जगज्जेता' 20 अब्ज डॉलर गुंतवण्याच्या तयारीत

Reliance Jio दणका करणार; स्वस्त किंमतीचे 1 कोटी स्मार्टफोन विकणार

WhatsApp वरील समाजकंटकांपासून कसे वाचाल? जाणून घ्या टिप्स अन् रहा सुरक्षित

Web Title: we'll welcome kangana Ranaut if she joins BJP or RPI : Ramdas Athavle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.