कसारा परिसरातील विहिरी आटल्या
By admin | Published: June 30, 2014 01:51 AM2014-06-30T01:51:31+5:302014-06-30T01:51:31+5:30
तीव्र पाणीटंचाईमुळे सामान्यांची होरपळ होत असतानाच विहिरीही तळाला गेल्या आहेत. शासनाकडून येणारे टँकरही कमी झाले आहेत.
Next
श्याम धुमाळ - कसारा
कसारा परिसरातील 21 पाडय़ांसह प्रमुख गावांत तीव्र पाणीटंचाईमुळे सामान्यांची होरपळ होत असतानाच विहिरीही तळाला गेल्या आहेत. शासनाकडून येणारे टँकरही कमी झाले आहेत. मान्सूनपूर्व पावसात केलेल्या पेरण्यांना बहर येऊन केवळ पाण्याअभावी पिके जळून गेली आहेत.
अगोदरच अठराविश्व दारिद्रय़ात काढणा:या कसा:यातील दुर्गम गावपाडय़ांतील आदिवासी बांधवांसह शेतक:यांवर निसर्गानेही कोप केल्याने आज उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. कसारा परिसरातील चिंतामणवाडी, लतिफवाडी, ओहळाची वाडी, नारळवाडी यासह दांड, उग्रांवणो, बिवळवाडी, धोबीपाडा, बेळूक, वाशाळा, मोखावणो, कसारा (खु़) यासह अन्य 21 गावपाडय़ांत 7क् टक्के आदिवासी समाज आहे, तर 3क् टक्के संमिश्र समाज आहे. रोजगाराचे अन्य साधन नसलेल्या या गावांना एकमेव शेतीचा आधार असतो. परंतु यावर्षी पावसानेच दांडी मारल्याने या भागात तीव्र पाणीटंचाईबरोबरच अन्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. उपरोक्त गावात असलेल्या विहिरी पूर्णता आटल्याने स्थानिक ग्रामस्थ महिला पाण्यासाठी रात्र जागून काढत आहेत. लहान मुलांसह पाणी शोधण्यासाठी महिला व पुरुष एक- दीड किलोमीटरवर असलेल्या डबक्यांचा शोध घेत पाणी भरीत आहेत. शासनाकडून येणारे टँकरही जूनअखेर बंद करण्यात आले आहेत. काही ठिकाणी टँकर सुरू असले तरी ते तुरळक प्रमाणात आठवडय़ातून एकदा येत आहेत.
परिणामी पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांना पावसाने हुलकावणी दिल्याने मान्सूनपूर्व झालेल्या पावसात शेतक:यांनी पेरणी केलेले भात, वरई, नागली ही पिके पूर्णत: करपली आहेत, तर जनावरांना पाणी, चारा नसल्याने जनावरांचीही मोठय़ा प्रमाणात उपासमार होत असल्याने यावर्षी मे ते 15 जूनदरम्यान या भागातील 2क् ते 25 जनावरे दगावली आहेत.
दरम्यान, शहापूर तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी स्वत: पुढाकार घेऊन वाशाळा परिसरात पाणीटँकर दिवसाआड सुरू केला असल्याने तेथील नागरिकांचा पाणीप्रश्न काही प्रमाणात मिटला असला, तरी गावपाडय़ांत पिण्यासाठीही पाणी नसल्याने शासकीय यंत्रणा हतबल झाली आहे. (वार्ताहर)
मंत्र्यांनी दिलेल्या
टाक्या रिकाम्या
दरम्यान मागील वर्षी पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी चिंतामणवाडी सह अन्य भागात 5 हजार लिटरच्या टाक्या भेट दिल्या होत्या. परंतु तेव्हापासून या टाक्या रिकाम्याच असून ज्या सरकारच्या मनगटा मध्येच पाणी नाही. ते जनसामान्यांना पिण्यास पाणी काय देणार? आम्ही शिवसेनेतर्फे या भागात लवकरच पाणी टँकर व चारा उपलब्ध करून देऊ.
- प्रकाश पाटील
जिल्हा परिषद ठाणो, गटनेते
व स्थानिक जि. प. सदस्य
शहापूरही तहानलेला
शहापूर तालुक्यात पाणी टंचाई आहेच. पण ऐनवेळी पावसानेही दांडी मारल्याने धरणातील या नदीपात्रतील पाणीसाठी कमी झाला आहे. यामुळे पाणी टँकरचे प्रमाणही कमी झाले. प्रशासनाकडून शक्य तितके पाणी टँकर टंचाईग्रस्त भागात पाठविण्याचे काम सुरु आहे.
- अविनाश कोष्टी
तहसीलदार, शहापूर
पाऊस लांबल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करावा
पावसाअभावी शेतक:यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे या भागात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतक:यांना मदत मिळावी अशी मागणी जि़प़ चे माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी ठाणो जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल भेरे यांनी केली आहे.