ब्रिटिशकालीन ‘शकुंतला’ बंद करण्याचा घाट

By admin | Published: July 30, 2015 03:16 AM2015-07-30T03:16:41+5:302015-07-30T03:16:41+5:30

मूर्तिजापूर-अचलपूर धावणारी ब्रिटिशकालीन शकुंतला नॅरोगेज रेल्वे शतकपूर्तीकडे वाटचाल करीत असली तरी ही पुरातन रेल्वे बंद करण्याचा घाट घातला जात आहे.

Western Ghat Ghat to stop 'Shakuntala' | ब्रिटिशकालीन ‘शकुंतला’ बंद करण्याचा घाट

ब्रिटिशकालीन ‘शकुंतला’ बंद करण्याचा घाट

Next

- सुनील देशपांडे,  अचलपूर (अमरावती)
मूर्तिजापूर-अचलपूर धावणारी ब्रिटिशकालीन शकुंतला नॅरोगेज रेल्वे शतकपूर्तीकडे वाटचाल करीत असली तरी ही पुरातन रेल्वे बंद करण्याचा घाट घातला जात आहे. दोन वर्षांपूर्वी रोडावलेल्या प्रवासी संख्येचे कारण पुढे करीत शकुंतलेचा प्रवास काही दिवसांसाठी थांबविला होता.
अचलपूर-मूर्तिजापूर धावणाऱ्या शकुंतलेशी या भागातील जनतेचे भावनिक नाते जुळले आहे. तत्कालीन खासदार सुदामकाका देशमुख ह्यांनी या नॅरोगेज रेल्वेचे ‘शकुंतला’ असे नामकरण केले होते. ब्रिटिशकाळात सुरू झालेली ही रेल्वे आज ९३ वर्षांची झाली आहे. हिचा लोहमार्ग ७५.६४ किलोमिटर असून तो डिसेंबर १९९३ मध्ये ‘ग्रेट इंडियन पेनीन्सूला’ कंपनीने बांधला होता. सेंट्रल रेल्वेची ब्रँच लाईन कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कंपनीसोबतचा करार संपुष्टात आल्यानंतर या रेल्वेमार्गाची दुरुस्ती व देखभाल कार्य तत्कालीन सेक्रेटरी आॅफ इंडिया यांच्या अधिकार कक्षेत आले आहे.

Web Title: Western Ghat Ghat to stop 'Shakuntala'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.