पश्चिम महाराष्ट्राला भूकंपाचा धक्का
By admin | Published: June 4, 2017 07:37 AM2017-06-04T07:37:59+5:302017-06-04T07:37:59+5:30
पश्चिम महाराष्ट्रासह कोयना धरण परिसर, कोकण किनारपट्टी शनिवारी रात्री भूकंपाच्या धक्क्याने हादरला.
Next
>ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. 4 - पश्चिम महाराष्ट्रासह कोयना धरण परिसर, कोकण किनारपट्टी शनिवारी रात्री भूकंपाच्या धक्क्याने हादरला. रिश्टर स्केलवर 4.8 इतकी भूकंपाची तीव्रता होती.
भूकंपाचा केंद्रबिंदू सांगलीपासून पश्चिमेला 84 किलोमीटर आणि राजगड पासून दक्षिणेकडे 133 किलोमीटर अंतरावर कोयना धरणाच्या परिसरात असल्याचं सांगण्यात येत आहे. मध्यरात्री 11 वाजून 44 मिनिटांनी हा भूकंपाचा धक्का जाणवला.
सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना प्रामुख्याने भूकंपाचा धक्के बसला. भूकंपामुळे काही काळ नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. या भूकंपामुळे कुठली हानी झाली नसल्याची खातरजमा प्रशासनाकडून केली जात आहे. तर भूकंपाच्या धक्क्यानंतर कोयना परिसरात पाऊस पडण्यास सुरूवात झाली. भूकंपामुळे कुठल्याही प्रकारची वित्त किंवा जीवित हानी झाल्याचे वृत्त अद्याप मिळाले नाही.