माजी गृहसचिवांच्या ‘त्या’ आरोपांचे काय?

By admin | Published: November 4, 2015 01:54 AM2015-11-04T01:54:52+5:302015-11-04T01:54:52+5:30

अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहीमच्या मुसक्या आवळण्याचा डाव मुंबई पोलिसांतील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे कसा फसला, याबाबत माजी गृहसचिव आर. के. सिंह यांनी दोन

What about the allegations made by former Home Secretary? | माजी गृहसचिवांच्या ‘त्या’ आरोपांचे काय?

माजी गृहसचिवांच्या ‘त्या’ आरोपांचे काय?

Next

मुंबई : अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहीमच्या मुसक्या आवळण्याचा डाव मुंबई पोलिसांतील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे कसा फसला, याबाबत माजी गृहसचिव आर. के. सिंह यांनी दोन महिन्यांपूर्वी जाहीर वाच्यता केल्यानंतरही महाराष्ट्र सरकारकडून मात्र यासंदर्भात कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही.
तथापि, सिंह यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपात तथ्य असल्यास चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु गृह विभागातील वरिष्ठ अधिकारी चौकशीबाबत उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.
काही पोलीस अधिकारी दाऊदसाठी काम करीत असल्याचा दावा छोटा राजनने मंगळवारी
करताना मुंबई पोलिसांनी माझ्यावर अन्याय केल्याचे सांगितले होते.
या संदर्भातील चौकशी कुठवर
आली यासंबंधी विचारणा करणारे अनेक मेसेज आणि फोन करूनही अतिरिक्त मुख्य सचिव के. बक्षी आणि
मुंबई पोलीस आयुक्त अहमद जावेद यांच्याकडून मात्र अपेक्षित
प्रतिसाद मिळू शकला नाही.
आॅगस्टमध्ये टेलिव्हिजनवरील मुलाखतीत माजी गृहसचिव आर.
के. सिंह यांनी खळबळजनक माहिती उघड केली होती.

मुख्यमंत्री म्हणाले होते आरोप गंभीर
आर. के. सिंह यांच्या या दाव्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते की, सिंह यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. यात तथ्य असेल तर चौकशी केली जाईल. छोटा राजननेही मंगळवारी सिंह यांच्यासारखेच मुंबई पोलिसांवर आरोप केले होते. मुंबई पोलिसांनी माझ्यावर खूप अन्याय केला. मुंबईतील काही पोलीस दाऊदला मिळाले असून ते दाऊदसाठी काम करतात.

‘राजकारणीही दाऊदचे काम करतात’
निवृत्त आयपीएस अधिकारी पी. के. जैन म्हणाले की, अनेक राजकारणी, अधिकारी, कर्मचारी दाऊदसाठी काम करतात. मग फक्त पोलिसांकडेच का बोट दाखविले जाते? विरोधी टोळीकडून माहिती मिळताच काही एन्काऊंटर स्पेशालिस्ट कमाईला लागतात. छोटा राजन जर सरकारी अधिकाऱ्यांना काही माहिती पुरवीत असेल तर ती स्वत:ची कातडी वाचविण्यासाठी. तो लोकांकडून खंडणी वसूल करायचा.

‘टोळी उद्ध्वस्त केल्याने हताश’
मुंबई पोलिसांतील एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले की, २०१२ पासून छोटा राजन मुंबई पोलिसांवर नाराज आहे.२०१२ मध्ये जे. डे हत्या प्रकरणाची चौकशी करताना विनोद असरानी ते त्याचा शार्प शूटर सतीश कालिया व पॉलसन जोसेफसारख्या त्याच्या लोकांना जेरबंद केले होते.

Web Title: What about the allegations made by former Home Secretary?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.