भारतमातेला वंदन करण्यात अपराधी वाटण्यासारखं काय ? - वैंकय्या नायडू
By admin | Published: June 18, 2016 04:29 PM2016-06-18T16:29:02+5:302016-06-18T17:02:49+5:30
समाजातील प्रत्येक घटकाला सामावून घेतलेल्या मातेला ‘भारत माता की जय’ असे म्हणून वंदन करण्यात अपराधी वाटण्यासारखे काय आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १८ - ‘भारत माता’ हे केवळ भौगोलिक चित्र नव्हे; सव्वाशे कोटी भारतीयांची ती माता आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सामावून घेतलेल्या मातेला ‘भारत माता की जय’ असे म्हणून वंदन करण्यात अपराधी वाटण्यासारखे काय आहे, असा सवाल करत, स्वातंत्र्यासाठी प्राणांची बाजी लावलेल्या महात्म्यांच्या जीवनचरित्रांचा शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश असायला हवा, अशी अपेक्षा केंद्रीय नगरविकास मंत्री वैंकय्या नायडू यांनी व्यक्त केली.
‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच’ या लोकमान्य टिळकांच्या गर्जनेच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘लोकमान्यांची सिंहगर्जना’ या पुस्तकाचे प्रकाशन नायडू यांच्या हस्ते झाले.
त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय उर्जामंत्री पियुष गोयल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, डॉ. दीपक टिळक, मुक्ता टिळक आदि मान्यवर उपस्थित होते.