मोकाट आरोपींवर काय कारवाई केली?

By admin | Published: April 2, 2016 01:39 AM2016-04-02T01:39:17+5:302016-04-02T01:39:17+5:30

मुरुड येथील सामाजिक बहिष्कारप्रकरणातील आरोपींनी गेल्या महिन्यात एका महिलेला मारझोड केली. मोकाट असलेल्या या आरोपींविरुद्ध आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली, याची तपशिलवार

What action has been taken against the accused persons? | मोकाट आरोपींवर काय कारवाई केली?

मोकाट आरोपींवर काय कारवाई केली?

Next

मुंबई : मुरुड येथील सामाजिक बहिष्कारप्रकरणातील आरोपींनी गेल्या महिन्यात एका महिलेला मारझोड केली. मोकाट असलेल्या या आरोपींविरुद्ध आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली, याची तपशिलवार माहिती देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सरकारला दिले. तसेच याप्रकरणाच्या तपासअधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले.
सामाजिक बहिष्कारप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकांवर न्या. अभय ओक व न्या. प्र्रकाश देव यांच्या खंडपीठापुढे होती.
मुरुड येथे एका दांम्पत्यावर बहिष्कार घालणाऱ्या आरोपींनी गेल्याच महिन्यात एका महिलेले मारहाण करण्यात आल्याची बाब याचिकाकर्त्यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणली. ‘आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्याची परवानगी अद्याप सरकारने दिली नाही. त्यामुळे हे आरोपी मोकाट आहेत. त्यांच्यावर केसेस नोंदवण्यात आल्या असूनही त्यांचे कृत्य सुरूच आहे,’ असे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी खंडपीठाला सांगितले.
याप्रकरणाच्या तपासाची तपशिलवार माहिती आम्हाला द्या. पुढील सुनावणीस या केसमधल्या तपासअधिकाऱ्यांना हजर करा, असे निर्देश खंडपीठाने दिले.
यापूर्वी उच्च न्यायालयाने आरोपींवर आरोपपत्र सादर करण्याचे निर्देश देऊनही अद्याप आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही. सरकार कारवाई करण्यास परवानगी देत नाही, अशी तक्रार याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी खंडपीठापुढे केली.
त्यावर सरकारी वकिलांनी सामाजिक बहिष्कारप्रकरणी ४६ केसेस नोंदवण्यात आल्या असून ४६ केसेमध्ये एफअआयआर नोंदवण्यात आला. तर २२ केसेसमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती उच्च न्यायालयाला दिली.

Web Title: What action has been taken against the accused persons?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.