दरवर्षी बजेटची काय गरज ? - उद्धव ठाकरे

By admin | Published: February 1, 2017 05:47 PM2017-02-01T17:47:40+5:302017-02-01T17:51:55+5:30

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लगेचच मोदी सरकारवर टीका केली.

What is the budget requirement every year? - Uddhav Thackeray | दरवर्षी बजेटची काय गरज ? - उद्धव ठाकरे

दरवर्षी बजेटची काय गरज ? - उद्धव ठाकरे

Next

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 1 - निवडणुकीच्या रणधुमाळीत सातत्याने भाजपाला लक्ष्य करणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लगेचच मोदी सरकारवर टीका केली. दरवर्षी अर्थसंकल्प सादर करण्याची काय गरज आहे ? मागच्यावर्षी अर्थसंकल्पात दिलेली आश्वासने पूर्ण केली का ? असे प्रश्न विचारुन त्यांनी आपल्याच सरकारवर टीका केली. 
 
राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपा युती तुटली असली तरी, केंद्रात आणि राज्यात शिवसेना भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी आहे. नोटाबंदीमुळे जनतेला मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागला. नोटाबंदीमुळे सरकारकडे मोठया प्रमाणावर रक्कम जमा झाली असली तरी, कर्जबुडवे निसटले आणि सर्वसामान्यांच्या खिशात हात घातला गेला असे उद्धव म्हणाले. 
 

Web Title: What is the budget requirement every year? - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.