CDR Case : सेलिब्रिटींना अडकवणारी सीडीआरची नेमकी भानगड आहे तरी काय? 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 05:31 PM2018-03-23T17:31:36+5:302018-03-23T17:41:39+5:30

नवाजुद्दिन सिद्दीकी, कंगणा रानौतपासून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी अडकलेले आहेत ते सीडीआर प्रकरण नेमके काय आहे?

what is cdr case involving bollywood celebrities | CDR Case : सेलिब्रिटींना अडकवणारी सीडीआरची नेमकी भानगड आहे तरी काय? 

CDR Case : सेलिब्रिटींना अडकवणारी सीडीआरची नेमकी भानगड आहे तरी काय? 

googlenewsNext

मुंबई :

कंगना राणौत
नवाजुद्दिन सिद्दिकी
आयेशा श्रॉफ
एकामागोमाग एक बॉलिवुड सेलिब्रिटींची नावे...ठाणे पोलिसांनी उघड केलेल्या सीडीआर प्रकरणात उघड होऊ लागली आणि सगळीकडे एकच खळबळ माजली. खरंतर डिटेक्टिव्ह रजनी पंडित यांच्या अटकेनंतरच सर्वांचं लक्ष सीडीआर प्रकरणाकडे गेलं होतं. पण सेलिब्रिटींची नावे आली या प्रकरणाला ग्लॅमरचा तडका मिळाला. चर्चा अधिकच वाढली. सध्या चर्चेत असलेल्या या प्रकरणातील सीडीआर नेमका आहे तरी काय ते समजवून घेऊया:

सीडीआर म्हणजे नेमके काय?

  • सीडीआर म्हणजे कॉल रेकॉर्डिंग डिटेल्स
  • सीडीआरमध्ये कॉलबद्दलची संपूर्ण माहिती असते
  • कॉल कोणी, कोणाला केला ते कळते
  • कॉल कोठून केला, कोणत्या ठिकाणी केला
  • कॉलची नेमकी वेळ
  • कॉल टोल-फ्री किंवा नॅशनल किंवा इंटरनॅशनल कॉल
  • कॉलसाठी आकारलेले शुल्क


सीडीआरची भानगड कशी होते?

  • सीडीआर ही गोपनीय माहिती असते
  • दुसऱ्या व्यक्तीची अशी माहिती मिळवणे गुन्हा
  • कायदेशीर मार्गाने पोलीस ती मिळवू शकतात
  • ती मिळवण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे पत्र लागते
  • टेलिकॉम कंपनी त्यानंतरच कॉल रेकॉर्ड डिटेल पुरवू शकते
  • मात्र या कायदेशीर मार्गाला झुगारून घोटाळेबाज सीडीआर मिळवतात
  • त्यासाठी काहीवेळी काही पोलीस अधिकारी साथ देतात, असा संशय आहे
  • काहीवेळा टेलिकॉम कंपनीतील कर्मचारी फोडूनही सीडीआर मिळवले जातात
  • काही हॅकरही गोपनीय माहिती फोडू शकतात

Web Title: what is cdr case involving bollywood celebrities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.