...यामध्ये अपराधीपणा कसला?

By Admin | Published: June 19, 2016 02:15 AM2016-06-19T02:15:22+5:302016-06-19T02:15:22+5:30

समाजातील प्रत्येक घटकाला सामावून घेतलेल्या मातेला ‘भारत माता की जय’ असे म्हणून वंदन करण्यात अपराधी वाटण्यासारखे काय आहे, असा सवाल केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या

What is criminal in this? | ...यामध्ये अपराधीपणा कसला?

...यामध्ये अपराधीपणा कसला?

googlenewsNext

पुणे : समाजातील प्रत्येक घटकाला सामावून घेतलेल्या मातेला ‘भारत माता की जय’ असे म्हणून वंदन करण्यात अपराधी वाटण्यासारखे काय आहे, असा सवाल केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केला. स्वातंत्र्यासाठी प्राणांची बाजी लावलेल्या महात्म्यांच्या जीवनचरित्रांचा शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश असायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच’ या लोकमान्य टिळकांच्या गर्जनेच्या शताब्दी वर्षानिमित्त डॉ. गिरीश दाबके संपादित ‘लोकमान्यांची सिंहगर्जना’ या पुस्तकाचे प्रकाशन नायडू यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय उर्जामंत्री पीयूष गोयल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, डॉ. दीपक टिळक, मुक्ता टिळक आदि उपस्थित होते.
नायडू म्हणाले, ‘सध्याच्या पिढीला महात्म्यांच्या हौतात्म्याची फारशी माहिती नाही. तरुणाईची वाचनाची आवडही पूर्वीसारखी राहिलेली नाही. या पिढीला स्वातंत्र्यसमराचे आणि इतिहासाचे स्मरण करुन देणे आवश्यक आहे. त्यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमांमध्ये थोर व्यक्तींच्या जीवनचरित्रांचा समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
टिळकांच्या सिंहगर्जनेच्या शताब्दीनिमित्त वर्षभर विविध उपक्रम राबवण्यासाठी राज्य सरकारने १० कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: What is criminal in this?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.