राज्यात क्रॉसपॅथी का?

By Admin | Published: June 2, 2016 02:24 AM2016-06-02T02:24:33+5:302016-06-02T02:24:33+5:30

अतिरिक्त अ‍ॅण्टीबायोटिक्सचा वापर केल्याने कालांतराने विषाणू औषधांना दाद देणे बंद करतात. विषाणूंनी औषधांना दाद देणे बंद केल्यास आजार बळावून रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होतो.

What is the cross-country in the state? | राज्यात क्रॉसपॅथी का?

राज्यात क्रॉसपॅथी का?

googlenewsNext

मुंबई : अतिरिक्त अ‍ॅण्टीबायोटिक्सचा वापर केल्याने कालांतराने विषाणू औषधांना दाद देणे बंद करतात. विषाणूंनी औषधांना दाद देणे बंद केल्यास आजार बळावून रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होतो. आणि आजारही आवाक्याबाहेर जातो. हे टाळण्यासाठी योग्य ती औषधे योग्य त्या प्रमाणात घेणे आवश्यक आहेत. पण, राज्यात ‘क्रॉसपॅथी’ सुरु झाल्यास वाढणाऱ्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटनेने (मार्ड) केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
अमेरिका, युनायटेड किंगडम, कॅनडा, जपान आणि चायना या देशांमध्येही विषाणू औषधांना दाद न देण्याचे प्रमाण जास्त होत असल्याचे दिसून आले आहे. तर, देशात हे प्रमाण सर्वाधिक आहे. आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथीच्या डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करायला दिल्यास औषधांना दाद न देण्याचा धोका वाढू शकतो. या पॅथीतील डॉक्टरांना एक वर्षाचा फार्माकालॉजीचा कोर्स पूर्ण करायची अट ठेवली आहे. त्यानंतर ते अ‍ॅलोपॅथीची औषधे देऊ शकतात. हे योग्य नाही. दिल्लीमध्ये क्रॉसपॅथी करण्यास मनाई आहे. मग, राज्यात क्रॉस पॅथीच्या पॅ्रक्टिसची परवानगी का? असा सवाल मार्डने उपस्थित केला आहे.

Web Title: What is the cross-country in the state?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.