राज्यातील किनाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी काय केले?

By admin | Published: February 3, 2016 03:19 AM2016-02-03T03:19:39+5:302016-02-03T03:19:39+5:30

यगड जिल्ह्यातील मुरूड येथे पुण्याहून सहलीला आलेल्या १४ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. या घटनेची गांभीर्याने दखल घेत मंगळवारी उच्च न्यायालयाने राज्यातील समुद्रकिनारे सुरक्षित

What did the coastal security of the state do for? | राज्यातील किनाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी काय केले?

राज्यातील किनाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी काय केले?

Next

मुंबई : रायगड जिल्ह्यातील मुरूड येथे पुण्याहून सहलीला आलेल्या १४ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. या घटनेची गांभीर्याने दखल घेत मंगळवारी उच्च न्यायालयाने राज्यातील समुद्रकिनारे सुरक्षित ठेवण्यासाठी व अशा दुर्घटना टाळण्यासाठी आत्तापर्यंत काय पावले उचलली? अशी विचारणा करत राज्य सरकारला यासंबंधी संपूर्ण माहिती बुधवारी सादर करण्याचे निर्देश दिले.
राज्यातील समुद्रकिनारे सुरक्षित ठेवण्यासाठी व अशा अप्रिय घटना घडू नयेत, यासाठी उच्च न्यायालयाने २००६मध्ये राज्य सरकार व महापालिकांना काही निर्देश दिले आहेत.
या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात न आल्याने जनहित मंच या एनजीओने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.
या याचिकेवरील सुनावणी
न्या. नरेश पाटील व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे
होती. (प्रतिनिधी)

Web Title: What did the coastal security of the state do for?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.