CoronaVirus News : संक्रमण आणखी वाढण्याची भीती; लोकल सुरू करून काय करणार?; राणेंनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 03:49 PM2020-06-11T15:49:03+5:302020-06-11T15:50:45+5:30

CoronaVirus News : राज्यात सध्याच्या घडीला कोरोनाबाधितांची संख्या ९४ हजारांहून अधिक झाली आहे.

What to do with starting local ?; Rane targets Thackeray government | CoronaVirus News : संक्रमण आणखी वाढण्याची भीती; लोकल सुरू करून काय करणार?; राणेंनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

CoronaVirus News : संक्रमण आणखी वाढण्याची भीती; लोकल सुरू करून काय करणार?; राणेंनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

Next

मुंबई/सिंधुदुर्ग : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असल्यानं ठाकरे सरकारची चिंताही वाढली आहे. त्यातच महाविकास आघाडी सरकारनं लॉकडाऊनमधूनही काहीशी सूट दिली आहे. त्यानंतर रुग्णवाढीचा वेग वाढला आहे. राज्यात सध्याच्या घडीला कोरोनाबाधितांची संख्या ९४ हजारांहून अधिक झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी टीव्ही ९ला मुलाखत देत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.  

लॉकडाऊन जसा हाताळला गेला पाहिजे, तसा तो हाताळता जात  नाही. लोकल सेवा सुरू करून काय करणार? असा सवाल उपस्थित करत संक्रमण आणखी वाढण्याची भीतीही नारायण राणे यांनी व्यक्त केली. राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या काही कमी होताना दिसत नाही. सरकारने आकडे कमी करून दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते उघडे पडतील. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, या मागणीवर आपण ठाम असल्याचा पुनरुच्चार नारायण राणे यांनी केला.

“निसर्ग चक्रीवादळ झालं, तेव्हा मी तिथेच होतो. मी नुकसान पाहिलं आहे. राज्य सरकारने ‘निसर्ग’ चक्रीवादळग्रस्तांना दिलेली मदत पुरेशी नाही. रायगड, रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील नागरिकांना झालेली मदत तुटपुंजी आहे. आर्थिक स्थिती वाईट असली तरी सरकारने मदतीचा फेरविचार करावा. लोकांना जास्तीत जास्त मदत करावी” अशी मागणी नारायण राणे यांनी केली आहे. सिंधुदुर्गाला 25 कोटींची मदत दिली, पण यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विविध योजनांतील 200 कोटी परत घेतले. ठाकरे सरकारने चेष्टा लावली आहे. लोकांच्या तोंडाला पाने पुसू नका. मच्छीमारांचं नुकसान झालं आहे. फक्त फेरफटका मारून काही होत नाही, असं टीकास्त्र राणेंनी ठाकरे सरकारवर सोडलं आहे.  केंद्राकडे आम्ही भरीव मदतीसाठी मागणी करू, असंही ते म्हणाले.

हेही वाचा

51 कोटी लोकांच्या खात्यात कोट्यवधी दिले, अमित शहांच्या दाव्यावर प्रकाश राज यांचा पलटवार

Web Title: What to do with starting local ?; Rane targets Thackeray government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.