तुम्हारे पास क्या हैं? मेरे पास ‘भाई’ हैं!

By admin | Published: September 28, 2014 02:05 AM2014-09-28T02:05:23+5:302014-09-28T02:05:23+5:30

रिटर्न ऑफ द भाई-भाई’ या ‘दिवार रिमेक’चं शूटिंग धूमधडाक्यात सुरू झालेलं. पिरमधील एक हिरो ऑलरेडी ‘सेट’वर दाखल.

What do you have I have 'brother'! | तुम्हारे पास क्या हैं? मेरे पास ‘भाई’ हैं!

तुम्हारे पास क्या हैं? मेरे पास ‘भाई’ हैं!

Next
>(‘रिटर्न ऑफ द भाई-भाई’ या ‘दिवार रिमेक’चं शूटिंग धूमधडाक्यात सुरू झालेलं. पिरमधील एक हिरो ऑलरेडी ‘सेट’वर दाखल. दुस:या हिरोची वाट पाहत पुस्तकवाचन सुरू. ‘संकटातून बाहेर कसं पडावं?’ असलंच काहीतरी त्या पुस्तकाचं नाव.)
डायरेक्टर : दुसरे हिरो लगेच पोहोचतो म्हणालेत.
बडा भाई : एवढय़ा सकाळी त्यांना जाग येते का?
डायरेक्टर : गेली आठ वर्षे ‘ब्लू-प्रिंट’ पिरमध्ये बिझी होते नां ते, त्यामुळं रात्री उशिरार्पयत जागरण व्हायचं.
बडा भाई : (खोचकपणो) बारामतीच्या अंकलनी सांगितल्यापासून म्हणो, मॉर्निग वॉक चालू केलंय. 
(एवढय़ात चॅनलवाल्यांसह दुस:या हिरोचं आगमन)
डायरेक्टर : (आश्चर्यानं) आपले कॅमेरे आहेत नां इथं. बाहेरचे का मागवले?
छोटा भाई : (नाकावरचा चष्मा बोटानं मागं सरकवत) ही ‘लाईव’वाली टीम आहे चॅनलवाल्यांची.
बडा भाई : पण, त्यांच्याभोवती बॉडीगार्डची गर्दी का?
छोटा भाई : (घुश्श्यात) तुमचा ‘मारामारी’चा शॉट सुरू झाला की हे गायब होतात माङया ‘शूटिंग’मधून; म्हणून त्यांना मी कुठंच जाऊ देत नाही. तुमच्यामुळंच तर माझा ‘ब्लू-प्रिंट’ सडकून आपटला नां.
डायरेक्टर : (लगेच विषय बदलत) चला सेट तयार आहे. लाईùùट कॅमेùùरा अॅक्शùùन.
बडा भाई : (अॅक्टींग करत) मेरे पास ‘फूल’ था. ‘शिट्टी’ थी. ‘सायकल’ थी..तुम्हारे पास क्या था?
छोटा भाई : मेरे पास भी आठ सालसे ‘ब्लू-प्रिंट’ थी. 
(एवढय़ात ‘दाढीवाला साईड हिरो’ मध्येच प्रकटतो.)
दाढीवाला : (हातातलं उसाचं कांडकं सोलून खात) अरेùù ओ म्हादबा.. कितने आदमी थे? ये दो.. और हम तीन. फिर भी खाली हाथ ‘कमळाक्का’ के पास गये. क्या समझके? ‘सूरत’ का सरदार बहोत खूश होगा? आंùù थ्थू. (शेवटच्या वाक्याला तोंडातून उसाचं चिपाड बाहेर पडतं, हे सुज्ञ वाचकांनी न सांगता ओळखून घ्यावं.)
डायरेक्टर : (खवळून) कट इटùù. ‘दिवार’च्या शॉटमध्ये ‘शोले’चा डायलॉग कसा काय घुसला?
दाढीवाला : (हळूच कानात) हे ‘दोन भाई’ काय करतात, यावर वॉच ठेवायला आलोय. वाटल्यास बाजूला बसतो. चालू द्या तुमचं शूटिंग.
बडा भाई : (पुन्हा शॉट सुरू) भाई. मेरे पास भी कुछ नही है और तेरे पास भी. फिर क्यूं ना हम दोनो एक हो जाय?
छोटा भाई : (राजेश खन्न्ना स्टाईल गदगदत) बहुत देर कर दी रेùù.. दस-बारा साल पहले अगर यही डायलॉग बोल देता तो, क्या नुकसान होता?
बडा भाई : (मिठी मारत) तब मेरा बेटा इतना बडा नहीं था. नहीं तो उसी वक्त एकही कुर्सीपे हम दोनोंको बैठा देता.
छोटा भाई : (‘खुर्ची’ शब्द ऐकताच लगेच ताठरत) नहीं भाई. ये नही हो सकता. क्युंकी हम दोनो के बीच ‘जेनेटिक प्रॉब्लेम’ है रेùù.                      
                                    - सचिन जवळकोटे

Web Title: What do you have I have 'brother'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.