...आहे यापेक्षा मनसेचे आणखी काय नुकसान होणार? - बाळा नांदगावकर

By admin | Published: January 31, 2017 04:09 PM2017-01-31T16:09:29+5:302017-01-31T16:16:59+5:30

महापालिका निवडणूक काही दिवसांवर आलेली असताना अद्यापही मनसेला लागलेली गळती थांबलेली नाही.

What else will the MNS suffer from this? - Bala Nandgaonkar | ...आहे यापेक्षा मनसेचे आणखी काय नुकसान होणार? - बाळा नांदगावकर

...आहे यापेक्षा मनसेचे आणखी काय नुकसान होणार? - बाळा नांदगावकर

Next

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 31 - मनसेने शिवसेनेला टाळी देण्याचा प्रयत्न करुन पाहिला. शिवसेनेकडे युतीचा प्रस्ताव घेऊन गेलेले मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर बोलताना अप्रत्यक्षपणे पक्ष सध्या अडचणीत असल्याची कबुलीच दिली. 
 
पत्रकाराने विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सध्या पक्ष ज्या स्थितीत आहे त्यापेक्षा मनसेचे आणखी नुकसान  होऊ शकत नाही असे वक्तव्य करुन अप्रत्यक्षपणे मनसे बॅकफुटवर असल्याचे मान्य केले. 
 
महापालिका निवडणूक काही दिवसांवर आलेली असताना अद्यापही मनसेला लागलेली गळती थांबलेली नाही. राज्यातील अनेक मोठे नेते, कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना, भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. त्यापार्श्वभूमीवर पक्षाचे जास्तीत जास्त नुकसान टाळण्यासाठी मनसे नव्या भिडूच्या शोधात आहे. 
 

Web Title: What else will the MNS suffer from this? - Bala Nandgaonkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.