'तेव्हा' बंद खोलीत नेमकं काय घडलं? राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या मर्मावरच बोट ठेवलं! केला रोखठोक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 09:05 PM2024-11-11T21:05:28+5:302024-11-11T21:07:30+5:30

आता महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी '2019 च्या खोलीवाल्या मुद्द्यावरून' उद्धव ठाकरे यांच्या मर्मावर बोट ठेवत थेट आणि रोखठोक सवाल केला आहे.

What exactly happened in the closed room Raj Thackeray put his finger on Uddhav Thackeray's intention and asked Question | 'तेव्हा' बंद खोलीत नेमकं काय घडलं? राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या मर्मावरच बोट ठेवलं! केला रोखठोक सवाल

'तेव्हा' बंद खोलीत नेमकं काय घडलं? राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या मर्मावरच बोट ठेवलं! केला रोखठोक सवाल

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. नेते मंडळी सभा, मुलाखती आदींमधून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतानाही दिसत आहेत. जस-जसा प्रचार पुढे सरकत आहे, तस-तशी या आरोप प्रत्यारोपांना आणखीनच धार चढताना दिसत आहे. यातच आता महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी '2019 च्या खोलीवाल्या मुद्द्यावरून' उद्धव ठाकरे यांच्या मर्मावर बोट ठेवत थेट आणि रोखठोक सवाल केला आहे. ते एका मुलाखतीत बोलत होते. ते एका वृत्तवाहिनी मुलाखतीत बोलत होते.

आपण उद्धव ठाकरे यांना वारंवार 'त्या' खोलीत काय झालं होतं? याची आठवण करून देता. तुम्ही जे बोलता तेच भाजप बोलते? असे विचारले असता, मनसे अध्यक्ष राज ठाकरे टीव्ही९ सोबत बोलताना म्हणाले, "खरे तर भाजप बोलण्याच्या आधी मी बोललोय. माझ्या तीन-चार वर्ष आधीच्या गुढीपाडव्याच्या सभेत मी ही गोष्ट बोललो होतो, जेव्हा हे झालं होतं तेव्हा. प्रश्न असा आहे की, तुमच्या समोर, व्यासपीठावर तुम्ही बसलेले असताना, नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, आमचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील. अमित शाह यांच्या सभेत तुम्ही बसलेले असताना, अमित शाह म्हणाले होते, आमचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील. तुम्ही आक्षेप का नाही घेतला? तुमचं म्हणणं आहे की, चार भिंतींच्या आत आमचं अडीच वर्षांचं ठरलं होतं, तुम्ही आक्षेप का नाही घेतला? का नाही बोललात तुम्ही की, हे अडीच वर्षांचं आपलं ठरलेलं आहे, त्याचं काय झालं?

दोनच लोक होते, त्यांचे दोन वेगवेगळे व्हर्जन आहेत?
यावर त्या खोलीत दोनच लोक होते, त्यांचे दोन वेगवेगळे व्हर्जन आहेत? असे विचारले असता, राज ठाकरे म्हणाले, "मला तेच म्हणायचे आहे की, तुमच्या समोर पब्लिकली हे झालं ना? दोघेही म्हणाले देवेंद्र फडणवीस होतील (मुख्यमंत्री). निवडणुका व्हायच्या होत्याना? प्रचाराच्या सभा होत्याना त्या? तेव्हा तुम्ही ऑब्जेक्शन का नाही घेतलं? असं म्हणाले का की, या दोन सभा झाल्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारला की, हे आपलं अडीच वर्षांचं ठरलेलं आहे, मग तुम्ही हे असं कसं बोलता?

...तेव्हा तुम्ही आवळायला सुरुवात केलं -
यावर, पण त्यांचा तर्क वेगळा आहे? असे म्हटले असता, राज ठाकरे म्हणाले, "अरे तर्काला काय अर्थ आहे? जेव्हा तुमच्या लक्षात आलं की, आपल्याशिवाय यांचं सरकार बसू शकत नाही, तेव्हा तुम्ही आवळायला सुरुवात केलं, की आमचा मुख्यमंत्री झाला पाहीजे."

यावर, तुमच्या बोलण्याचा एकंदरित अर्थ असा निघतो की उद्धव ठाकरे यांनी हे सर्व मुख्यमंत्री पदासाटी केलं? असे विचारले असता राज ठाकरे म्हणाले, "शंभर टक्के"! 
 

Web Title: What exactly happened in the closed room Raj Thackeray put his finger on Uddhav Thackeray's intention and asked Question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.