‘ती’चा गणपती सेलिब्रेटी काय म्हणतात..

By admin | Published: September 7, 2014 12:29 AM2014-09-07T00:29:13+5:302014-09-07T00:29:13+5:30

‘ती’चा गणपती ही खूप छान संकल्पना आहे. मला असं वाटतं, की जर महिला सर्वच क्षेत्रंत अग्रेसर राहत असतील, तर त्यांनी इथेही पुढाकार घ्यायला हवा.

What is the 'Ganesh celebrity' of 'she' | ‘ती’चा गणपती सेलिब्रेटी काय म्हणतात..

‘ती’चा गणपती सेलिब्रेटी काय म्हणतात..

Next
‘ती’चा गणपती ही खूप छान संकल्पना आहे. मला असं वाटतं, की जर महिला सर्वच क्षेत्रंत अग्रेसर राहत असतील, तर त्यांनी इथेही पुढाकार घ्यायला हवा. एक मुलगी म्हणून आणि घरातील कमावणारी व्यक्ती म्हणून मलाही असं वाटतं, की आपल्याही घरात गणपती यावा. म्हणून मी ‘लोकमत गणोश मंडळा’कडून प्रेरणा घेऊन पुढच्या वर्षी स्वत: घरामध्ये गणपती बसविणार आहे.- सई ताम्हणकर
हा उपक्रम खूपच सुंदर आहे. यामुळे महिलांना प्रोत्साहन मिळेल. एरवी आपल्या घरातील पुरुषच गणपतीची प्रतिष्ठापना करतात, पूजा करतात, विसर्जन करतात. ‘लोकमत’ने ‘ती’चा गणपती सुरू केला, हे फार चांगले आहे. जगात याआधी कुठेही असा प्रयोग झाल्याचे मी तरी ऐकलेले नाही. लोकमतला खूप खूप शुभेच्छा.
- उषा जाधव
ही कल्पना फारच नावीन्यपूर्ण वाटली. एरवी महिलांना सणासुदीला काम करणो एवढेच करावे लागते. सगळीकडे पुरुषच पुढे असतात; पण हा वेगळा पायंडा पडला आहे. हा उपक्रम असाच सुरू ठेवावा. लोकमतला माझा सलाम. 
- क्रांती रेडकर
सखी मंचच्या पुढाकाराने संपूर्णपणो महिलांचे व्यवस्थापन असलेले देशातील पहिले गणपती महिला मंडळ पुण्यात स्थापन झाले. ही पुणोकरांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. स्त्रीशक्तीला एक नवी ओळख देणारा हा उपक्रम आहे.                    - प्राजक्ता माळी
पुरोगामी चळवळीची पुण्यातून सुरुवात झाल्यावर ती देशामध्ये पसरते, हा इतिहास आहे. ‘ती’चा गणपती ही संकल्पनाही संपूर्ण राज्यात आणि देशात पोहोचावी, यासाठी ‘लोकमत’ला शुभेच्छा. 
- बेला शेंडे
‘ती’चा गणपती ही खूप चांगली कल्पना आहे. खरे तर स्त्रियाच उत्सवात सगळे काही नियोजन आणि कामही करतात; पण तरीही मागे राहतात. त्यांना योग्य तो मान दिला गेलाच पाहिजे. ‘लोकमत’ने हे पाऊल उचलले, याचे मला कौतुक वाटते. 
- दीपाली सय्यद
अशा कल्पनेबद्दल मी पहिल्यांदाच ऐकते आहे. अशी अभिनव कल्पना सुचल्याबद्दल ‘लोकमत’चे अभिनंदन. यापूर्वी कुणालाच असे काही करावेसे वाटले नव्हते. पुण्यासारख्या ठिकाणी हा प्रयोग पहिल्यांदा होत आहे, याबद्दल मला अभिमान वाटतो. 
- मानसी नाईक
खूपच छान कल्पना आहे. मला खरोखर खूप अभिमान वाटतोय. मुली, स्त्रियाच एकत्र येऊन हे सगळे करताहेत, हे खूपच विशेष आहे. 
- नम्रता गायकवाड
ब:याच देवस्थानांत स्त्रियांना गाभा:यात प्रवेश नसतो, याचे खूप वाईट वाटते. या पाश्र्वभूमीवर महिलांचा गणपती ही कल्पना खूपच वाखाणण्यासारखी आहे. अशा गोष्टींमुळे बदलाला सुरुवात होत असते, हे लक्षात घ्यायला हवे. 
- ऋजुता देशमुख
स्त्रिया कोणतीही गोष्ट करू शकतात. त्यामुळे हेही त्या व्यवस्थित करतीलच. या निमित्ताने काही तरी जागृती होतेय, काही बदलू पाहतेय, हे महत्त्वाचे. हा विचार जास्तीत जास्त लोकांर्पयत पोहोचवायला हवा. 
- तेजस्विनी लोणारी
वयाच्या 16व्या वर्षापासून मी स्वत: घरच्या गणपतीची प्रतिष्ठापना करते. आता महिला पुढे येत आहेत. ढोल-ताशा, दहीहंडी अशा अनेक उपक्र मांत सहभागी होतात. परंतु, गणपती प्रतिष्ठापना, पूजा, विसजर्न यांसाठी पुरुषच पुढे असतात. ‘लोकमत’ने सुरू केलेला हा ‘ती’चा गणपती अतिशय स्तुत्य वाटला. या मंडळात सहभागी होण्यास मी उत्सुक आहे.
- तेजस्विनी पंडित

 

Web Title: What is the 'Ganesh celebrity' of 'she'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.