पाकच्या कोर्टात आधी टाकलेल्या 'बॉल’चे काय झाले? - उद्धव ठाकरे

By admin | Published: January 11, 2016 10:13 AM2016-01-11T10:13:00+5:302016-01-11T16:20:29+5:30

पाकिस्तानला पुरावे देऊन कारवाईची वाट बघण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून जोरदार टीका केली आहे.

What happened to the 'ball' before the Pakistan court? - Uddhav Thackeray | पाकच्या कोर्टात आधी टाकलेल्या 'बॉल’चे काय झाले? - उद्धव ठाकरे

पाकच्या कोर्टात आधी टाकलेल्या 'बॉल’चे काय झाले? - उद्धव ठाकरे

Next

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ११ - पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानला पुरावे देऊन कारवाईची वाट बघण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून जोरदार टीका केली आहे. 
पाकिस्तानने हिंदुस्थानवर हल्ले करायचे, त्या हल्ल्यात आमचे पाच-दहा जवान शहीद व्हायचे व मग पाकिस्तानच्या कोर्टात कारवाईचा ‘फुटबॉल’ टाकून आपण निपचित पडायचे. संसदेवरील हल्ल्याचा ‘बॉल’ही असाच त्यांच्या कोर्टात गेला. मुंबईवरील हल्ल्याचा बॉलही पाकड्यांच्या कोर्टातच गेला. पाकच्या कोर्टात आपण आतापर्यंत इतके बॉल ढकलले आहेत की या ‘बॉल’चा लिलाव करून पाकिस्तानच्या ठणठणाट असलेल्या तिजोरीत मोठी भर पडू शकेल. पठाणकोटचा बॉल टाकण्याआधी पाकच्या कोर्टात या आधी टाकलेल्या सर्व ‘बॉल’चे काय झाले? याचा विचार कुणी केल्याचे दिसत नाही. त्यांनी आम्हाला धरून आपटायचे व आपण त्यांच्या कोर्टात फक्त बॉल ढकलत पुढच्या हल्ल्याची वाट बघत बसायचे. हे ‘बॉल’ प्रकरण हिंदुस्थानच्या सुरक्षेचे व इज्जतीचे धिंडवडेच काढीत आहे अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखात टीका करण्यात आली आहे. 
संसदेवरील हल्ल्याचा सूत्रधार अफझल गुरू होता व त्याला फासावर लटकवल्याबद्दल पाकमधील सर्वच दहशतवादी संघटनेने थयथयाट केला होता. त्या अफझल गुरूचा सूड एक दहशतवादी संघटना घेऊ शकते. मग पठाणकोटचा सूड इतका मोठा प्रचंड लष्करी सामर्थ्य वगैरे असलेला देश का घेऊ शकत नाही? मुंबईवरील हल्ल्यानंतरही आपण तसे हात चोळतच बसलो व पठाणकोटच्या हल्ल्यानंतर कोण काय चोळत बसले आहे ते त्यांनाच ठाऊक. सरकार म्हणून काही मजबुर्‍या असू शकतात, पण या मजबुर्‍या फक्त हिंदुस्थानच्याच बाबतीत का असाव्यात?  असा सवाल या अग्रलेखात विचारण्यात आला आहे. 
 
सामनाच्या अग्रलेखातील मुद्दे 
पंतप्रधान मोदी यांनी पठाणकोट हवाई तळाचा दौरा केला व जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. प्राण पणास लावून जवानांनी हिंदुस्थानची इभ्रत वाचवली याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. त्याचवेळी तिकडे पाकिस्तानात हिंदुस्थानच्या जखमेवरील खपली काढण्याचे काम जैश-ए-मोहम्मदवाल्यांनी केले आहे. फक्त सहा अतिरेकी हिंदुस्थानच्या लष्कराला भारी पडले अशी खिल्ली ‘जैश’कडून उडवली गेली. या लोकांच्या नांग्या ठेचणे किती गरजेचे आहे याचाच हा पुरावा नाही का? अशा सैतानांना मूंहतोड जबाब दिल्याशिवाय मुंबई-पठाणकोटसारखे प्रकार थांबणार नाहीत. हिंदुस्थानच्या राज्यकर्त्यांनी क्षत्रिय धर्माचे पालन करून देशाच्या दुश्मनांचा बंदोबस्त वेळीच केला नाही तर सारेच अवघड होऊन जाईल. सध्या शाकाहारीचा बराच बोलबाला आहे व केंद्र सरकारातील बरेच कर्ते पुरुष हे शुद्ध शाकाहारी आहेत, पण आज पठाणकोटचा हल्ला त्या सगळ्यांच्या घशातील ‘हड्डी’ बनला आहे. ही ‘हड्डी’ गिळताही येत नाही व बाहेर काढताही येत नाही अशी बिकट स्थिती आहे.
बॉल पाकिस्तानच्या कोर्टात, म्हणजे ‘Ball in Pakistan’s court’ असे जाहीर झाले आहे. पठाणकोटवरील हल्ल्याचा सूत्रधार अझर मसूद व त्याचा भाऊ आहे. हिंदुस्थानात ‘जिहाद’ पुकारण्यासाठी त्याच ‘जैश-ए-मोहम्मद’ संघटनेत तो सतत ऑनलाइन भरती करत असतो. हिंदुस्थानवर हल्ला करण्याबाबत त्यांची सैतानी वक्तव्ये पाहिली तर पठाणकोटवरील हल्ल्याबाबत पाक सरकारला कोणतेही पुरावे देण्याची गरज नसावी. पण आता पाक सरकार पुरावे मागील व त्या पुराव्याच्या खेळखंडोबात पठाणकोटचा ‘फुटबॉल’ पंक्चर होईल. 
 
पाकिस्तानने हिंदुस्थानवर हल्ले करायचे, त्या हल्ल्यात आमचे पाच-दहा जवान शहीद व्हायचे व मग पाकिस्तानच्या कोर्टात कारवाईचा ‘फुटबॉल’ टाकून आपण निपचित पडायचे. संसदेवरील हल्ल्याचा ‘बॉल’ही असाच त्यांच्या कोर्टात गेला. मुंबईवरील हल्ल्याचा बॉलही पाकड्यांच्या कोर्टातच गेला. पाकच्या कोर्टात आपण आतापर्यंत इतके बॉल ढकलले आहेत की या ‘बॉल’चा लिलाव करून पाकिस्तानच्या ठणठणाट असलेल्या तिजोरीत मोठी भर पडू शकेल. पठाणकोटचा बॉल टाकण्याआधी पाकच्या कोर्टात या आधी टाकलेल्या सर्व ‘बॉल’चे काय झाले? याचा विचार कुणी केल्याचे दिसत नाही. त्यांनी आम्हाला धरून आपटायचे व आपण त्यांच्या कोर्टात फक्त बॉल ढकलत पुढच्या हल्ल्याची वाट बघत बसायचे. हे ‘बॉल’ प्रकरण हिंदुस्थानच्या सुरक्षेचे व इज्जतीचे धिंडवडेच काढीत आहे. पठाणकोटचा हल्ला हा अफझल गुरूला फासावर लटकवल्याचा बदला असल्याचे जैश-ए-मोहम्मदने जाहीर केले. संसदेवरील हल्ल्याचा सूत्रधार अफझल गुरू होता व त्याला फासावर लटकवल्याबद्दल पाकमधील सर्वच दहशतवादी संघटनेने थयथयाट केला होता. त्या अफझल गुरूचा सूड एक दहशतवादी संघटना घेऊ शकते. मग पठाणकोटचा सूड इतका मोठा प्रचंड लष्करी सामर्थ्य वगैरे असलेला देश का घेऊ शकत नाही? मुंबईवरील हल्ल्यानंतरही आपण तसे हात चोळतच बसलो व पठाणकोटच्या हल्ल्यानंतर कोण काय चोळत बसले आहे ते त्यांनाच ठाऊक. सरकार म्हणून काही मजबुर्‍या असू शकतात, पण या मजबुर्‍या फक्त हिंदुस्थानच्याच बाबतीत का असाव्यात? रशिया, फ्रान्स, अमेरिका, इंग्लंडसारखी राष्ट्रे त्यांच्या मुळावर येणार्‍यांचा चोख बंदोबस्त जगाची पर्वा न करता सतत करीत असतात. कारवाईचे बॉल दुश्मन राष्ट्रांच्या कोर्टात ढकलून ते पुढचे बॉल खेळत बसत नाहीत. जगाकडून आपण निदान एवढे तरी शिकायलाच हवे. 
 
जगाचे मन जिंकायच्या गोष्टी सध्या सुरू आहेत, पण त्या जुगारात आमची भारतमाता हिरव्या कौरवांनी जिंकू नये व वनवासात जायची वेळ येथील राष्ट्राभिमानी जनतेवर येऊ नये हीच आमची तळमळ आहे. हल्ले पचविण्याची आपली सहनशक्ती वाखाणण्यासारखी आहे. पण शेवटी सहनशक्तीचाही स्फोट होतोच. पंतप्रधान मोदी यांच्याही सहनशक्तीचा स्फोट होऊन त्या स्फोटात ‘जैश’सारख्या देशाच्या दुश्मनांच्या चिंधड्या चिंधड्या होवोत हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना. 

Web Title: What happened to the 'ball' before the Pakistan court? - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.