नाशिकात काय घडले? फडणवीसांना पाय ठेवू न देण्याचा इशारा देणारा ठाकरे गट शांततेत जाऊन भेटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 14:49 IST2025-03-23T14:49:09+5:302025-03-23T14:49:50+5:30
नाशिक येथील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन गळ्यात भगवी शाल घालून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

नाशिकात काय घडले? फडणवीसांना पाय ठेवू न देण्याचा इशारा देणारा ठाकरे गट शांततेत जाऊन भेटला
ठाकरे गटाने कुंभमेळा आणि नाशिक शहरातील विकासकामांसह पालकमंत्री पदावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाय ठेवू देणार नाही असा इशारा दिला होता. परंतू, आज प्रत्यक्षात ठाकरे गटाचे कार्यकर्ते शांततेत फडणवीसांना जाऊन भेटले आहेत.
नाशिक येथील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन गळ्यात भगवी शाल घालून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याचबरोबर फडणवीस यांना पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.
कालपर्यंत अगदी फडणवीसांना नाशिकमध्ये पाय ठेवू देणार नाही, असे म्हणणारे ठाकरे गटाचे पदाधिकारी एवढे मवाळ का झाले अशी चर्चा रंगली आहे. शहर विकास तसेच कुंभमेळा संबंधित बैठकांमध्ये सर्व पक्षांच्या सदस्यांना सामील करून घ्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. फडणवीस यांना नाशिक मध्ये पाय न ठेवू देण्याचा इशारा देणाऱ्या या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती ठाकर गटाच्या जिल्हा प्रमुखांनी दिली आहे.
आंदोलन न करता भेट घेऊन निवेदन दिले असून मागणी मान्य न केल्यास सर्वसामान्य जनतेला घेऊन आंदोलनाचा इशारा आता डी. जी. सूर्यवंशी, जिल्हाप्रमुख ठाकरे गट यांनी दिला आहे.