महाराष्ट्राच्या तरुणाईला झालंय तरी काय? दररोज सरासरी १३ युवा संपवताहेत जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 06:04 AM2023-02-26T06:04:06+5:302023-02-26T06:04:44+5:30
नववर्षात नवे संकल्प केले जातात. मात्र, २०२३ च्या सुरुवातीलाच आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे.
मुंबई : या राज्यातील तरुणाईला झालंय तरी काय? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कारण, महाराष्ट्रात दररोज सरासरी १३ युवा वेगवेगळ्या कारणांपायी चक्क आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलत आहेत. घरगुती भांडणे, नैराश्य/तणाव, एकतर्फी प्रेमप्रकरणे, आर्थिक विवंचना यातून या आत्महत्या होत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ चमूच्या अभ्यासातून पुढे आले आहे. नववर्षात नवे संकल्प केले जातात. मात्र, २०२३ च्या सुरुवातीलाच आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे. १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या दीड महिन्याच्या कालावधीत तब्बल १,०२३ आत्महत्या झाल्या असून यापैकी निम्म्या २० ते ४५ या वयोगटातील आहेत.
कौटुंबिक कलह, ताण-तणाव, विरह, अपयश, अवहेलना, व्यसन, न्यूनगंड, गरिबी असो की डोक्यावर कर्जाचा डोंगर... यातून आलेल्या नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न होतो. नैराश्यावर मात करणे कठीण असले तरी अशक्य नाही. सर्वांत चांगला उपाय म्हणजे मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणे. औषधोपचार आणि समुपदेशनामुळे चांगला फरक पडतो.
- डॉ. अभिषेक सोमाणी, प्रमुख, मनोविकृतीशास्त्र, मेयो रुग्णालय, नागपूर
ही आहेत कारणे...
आजारपण, प्रेमप्रकरण, व्यसन, नैराश्य, कर्जबाजारीपणा, आर्थिक चणचण, कौटुंबिक कलह, लग्न ठरत नसल्याने, बेरोजगारी कौटुंबिक वाद, अभ्यासाचे टेन्शन, शेतीचे नुकसान, नापिकी, सासरी होणारा छळ,
विदर्भ
वयोगट
० ते १२ ०
१३ ते १९ १५
२० ते ४५ १६६
४५ पुढे १०४
मराठवाडा
वयोगट
० ते १२ २
१३ ते १९ २३
२० ते ४५ १४२
४५ पुढे ७३
उ. महाराष्ट्र
वयोगट
० ते १२ ०
१३ ते १९ ८
२० ते ४५ १२१
४५ पुढे २६
काेकण
वयोगट
० ते १२ ०
१३ ते १९ ४
२० ते ४५ १३
४५ पुढे ६
प. महाराष्ट्र
वयोगट
० ते १२ २
१३ ते १९ ७
२० ते ४५ १५०
४५ पुढे ६२