Devendra Fadanvis: फडणवीसांनी दिलेल्या त्या व्हिडीओंमध्ये नेमके आहे तरी काय? पहिल्यांदाच आले समोर; वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 08:46 AM2022-03-09T08:46:30+5:302022-03-09T08:47:26+5:30

Devendra Fadnavis allegations on sting operation: केंद्र सरकार राज्यातील नेत्यांविरुद्ध हेतूत: षड् यंत्र रचत असल्याच्या सातत्याने होणाऱ्या आरोपांना फडणवीस यांनी या आरोपांच्या माध्यमातून उत्तर दिले.

What is in the sting recording given by Devendra Fadnavis in Pendrive? Came to the front for the first time; Read what adv pravin chavan talking | Devendra Fadanvis: फडणवीसांनी दिलेल्या त्या व्हिडीओंमध्ये नेमके आहे तरी काय? पहिल्यांदाच आले समोर; वाचा...

Devendra Fadanvis: फडणवीसांनी दिलेल्या त्या व्हिडीओंमध्ये नेमके आहे तरी काय? पहिल्यांदाच आले समोर; वाचा...

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे नेते विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण यांना हाताशी धरून भाजपच्या अनेक नेत्यांना बनावट प्रकरणांत गोवण्याचे षड् यंत्र रचत असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केला. या कटकारस्थानात पोलीस गुंतलेले असल्याने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. केंद्र सरकार राज्यातील नेत्यांविरुद्ध हेतूत: षड् यंत्र रचत असल्याच्या सातत्याने होणाऱ्या आरोपांना फडणवीस यांनी या आरोपांच्या माध्यमातून उत्तर दिले.

विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे विविध लोकांशी झालेले संवाद...

व्हिडीओ १
वकिलांचा संवाद : आम्हाला पैसा निलेश पुरवायचा, गुंडागर्दी करणे, दहशत पसरविणे असे सांगायचे आहे.
ड्रग्जचा व्यवसाय करतो, हे तो सांगेल का? असे सांगितले तरच मोक्का लागेल. सट्ट्याच्या पैशांतून मोक्का लागत नाही. पण, सट्ट्याच्या पैशांतून ड्रग्ज म्हटले की मोक्का लागेल. १ ग्रॅमला लाख रूपये मिळतात, असे सांगायचे.

व्हिडीओ २

  • तो गिरीश महाजन यांचे नाव घ्यायला तयार आहे ना? एक छोटा जबाब तयार करतो. तो माफीचा साक्षीदार व्हायला तयार आहे का?
  • ड्रग्जचे नाव घेतले की, आपला मोक्का एकदम फिट बसतो. आणि ड्रग्ज सापडलेच पाहिजे, असे कुठे आहे? सापडले तरच गुन्हेगार असतो, असे नाही. 
  • शिक्षण संस्था आहे, तेथे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मार्केट खूप मोठे आहे, असे सांगायचे. त्याला पैसे दिले आहेत ना आपण?
  • सुनील गायकवाड, महेंद्र बागुल, सूर्यवंशी. रवी शिंदेने त्याचे नाथाभाऊंशी बोलणे करून दिले. संस्था आपल्या ताब्यात आहे तोवर कोट्यवधी रुपये कमवू शकतो, असे भासवायचे.

 

व्हिडीओ ३

या घटनेप्रमाणे साक्षीदार तयार करावे. गिरीश महाजनचे नाव घ्यायला सांगा. रामेश्वर आणि गिरीश महाजनचे नाव घ्या. सर्व जबाब वाचून काय अ‍ॅड करायचे ते करा.
सारे जबाब मी लिहून दिले होते, त्यांनी हरवून टाकले. सगळा गोंधळात गोंधळ करून टाकला.
अ‍ॅड. प्रवीण चव्हाण हे कट कसा रचत आहेत, याचे एसीपी सुषमा चव्हाण यांच्याशी झालेले संभाषण

  • रेडमध्ये सहभागी होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची संपूर्ण व्यवस्था ते सांगत आहेत. कुठल्या मार्गाने जायचे आणि काय काय करायचे, याची सूक्ष्म व्यवस्था सरकारी वकिलांनी ब्रीफ केली आहे. अगदी सरकारचे रेस्टहाऊस सुद्धा बुक करून दिले आहे. वेज/नॉन-वेज जेवणापर्यंत सुक्ष्म नियोजन
  • जेवणाची/राहण्याची आणि रूम कुणाच्या नावाने बुक करायच्या, कॅशमध्ये कसे पैसे द्यायचे, याची संपूर्ण कथा ते सांगत आहेत.
  • यासाठी कोणती मदत लागली तर खडसे साहेबांची मदत घ्या, असेही निर्देश दिले आहेत. खडसे साहेब सर्व पैसे देतील, असेही त्यांनी सांगितले.

 

व्हिडीओ १०

  • त्याला ब्लड लावून ठेवले असते आणि चाकू जप्त केला असता.
  • एक चाकू विकत घ्यायचा आणि जोवर चर्चा सुरू आहे, तोवर तेथे फेकून द्यायचा. जप्त करायला काय लागते?
  • किती जणांनी माझे नाव या केससाठी रेकमंड केले?
  • दिलीप बोरले, वळसे पाटील, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अर्जुन खोतकर, अनिल देशमुख, रमेश जाधव, गुलाबराव, हसन मुश्रिफ, श्रीनिवास पाटील यांची नावे घेत, त्यांची पत्र मोबाईलवर दाखवितात.
  • गिरीश महाजन अटकत नाही. सीपीला काढल्याशिवाय पर्याय नाही. डीजीला भेटणार आहे. नाव घेत नव्हते.

व्हिडीओ २०
एसीपी सुषमा चव्हाण, पौर्णिमा गायकवाड, अ‍ॅड. प्रवीण चव्हाण संभाषण

  • हॉटेलचे बिल देऊ नका, १० हजार दिले आहेत.
  • तेथे आपला माणूस ठेवा. तो दोन फाईलमध्ये गिरीश महाजन यांचे फोटो ठेवायचे आहे.
  • पंचांची नावे मी व्हॉटस् अ‍ॅपवर पाठवितो.
  • दोन सायबर एक्सपर्ट ठेवा. ती आपली माणसं असतील.
  • जे आपल्याला माहिती आहे, ते पोलिसांना कुठे माहिती आहे. दोन टेक्नीशियन सोबत ठेवायचे आणि ते ऐवज ठेवून देतील. 

 

...हे मोठे षड् यंत्र
आज सभागृहात क्लिप दिल्या आहेत, त्या पडताळून घ्या. हे सर्व प्रकरण गंभीर आहे. हे मोठे षड् यंत्र आहे. पण राज्य सरकारला कोणतेही प्रकरण गंभीर वाटत नाही. सिनेमामध्ये पाहतो त्यापेक्षा भयंकर चालू आहे. या कटात सर्व अधिकारी, पोलीस अधिकारी आहेत. संबंधित सरकारी वकील तर काळ्या कोटातील वाझे निघाला. हे सर्व प्रकरण सीबीआयकडे द्यायला हवे. सरकारी वकील मोठे साहेब असे म्हणत आहे, म्हणजे शरद पवार यांचे नाव घेत आहेत का, याचीही चौकशी व्हायला हवी. 
 - आ. गिरीश महाजन, भाजप नेते

Web Title: What is in the sting recording given by Devendra Fadnavis in Pendrive? Came to the front for the first time; Read what adv pravin chavan talking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.