हे चाललेय तरी काय?
By admin | Published: July 8, 2014 01:28 AM2014-07-08T01:28:15+5:302014-07-08T01:28:15+5:30
शासकीय दंत महाविद्यालयाचा एक कंत्राटी लेक्चरर मागील काही महिन्यांपासून असभ्य वर्तवणूक करीत असल्याचा आरोप महाविद्यालयाच्या इंटर्न्सच्या विद्यार्थिनींनी केल्याने खळबळ उडाली आहे.
प्राध्यापकाचे विद्यार्थिनीशी गैरवर्तन
नागपूर : शासकीय दंत महाविद्यालयाचा एक कंत्राटी लेक्चरर मागील काही महिन्यांपासून असभ्य वर्तवणूक करीत असल्याचा आरोप महाविद्यालयाच्या इंटर्न्सच्या विद्यार्थिनींनी केल्याने खळबळ उडाली आहे. हे प्रकरण अधिष्ठाता डॉ. विनय हजारे यांनी महाविद्यालयातील महिला तक्रार निवारण समितीकडे सुपूर्द केले आहे. चौकशी सुरू असल्याने सध्याच काही बोलण्यास नकार दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दंत महाविद्यालयात सहा महिन्यांपूर्वी कंत्राट पद्धतीवर एक लेक्चरर रुजू झाले, मागील काही महिन्यांपासून इंटर्न्सच्या विद्यार्थिंनीना ‘एसएमएस’ पाठविणे, फेसबुकवर पाठविलेल्या फोटोला ‘लाईक’ करण्याचा आग्रह धरणे, विद्यार्थिनींना पार्टी मागणे किंवा पार्टी देतो म्हणून त्यांना बोलविणे, विद्यार्थिनींना विभागात बोलवून आपल्यासमोर उभे करणे, वाईट नजरेने पाहणे, विशिष्ट मुलींनाच विविध कॅम्पमध्ये पाठविणे, नाही गेल्यास त्यांना झापणे, परीक्षेत कमी गुण देण्याची धमकी देणे आदी तक्रारी विद्यार्थिंनींनी आठवड्यापूर्वी डॉ. हजारे यांच्याकडे मांडल्या. त्यांनी लागलीच महिला तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल करून चार सदस्यीय चमूंची चौकशी समिती स्थापन केली. यात दंत महाविद्यालयाच्या एक वरिष्ठ महिला डॉक्टर व दोन सदस्या बाहेरच्या आहेत.
प्राध्यापिकेला विद्यार्थ्याने फसविले
नागपूर : खोटे नाव आणि पत्ता तसेच स्वत:बद्दल अतिरंजित माहिती देऊन एका तरुणाने एका प्राध्यापक तरुणीशी सलगी वाढवली. तिच्या कुटुंबीयांनाही त्याने विश्वासात घेतले. कुटुंबीयांकडून होकार मिळाल्यामुळे तरुणीसोबत सैरसपाटा करण्याचा बेत आखला आणि रस्त्यातच त्याने तिच्याशी लगट केली. त्याचे कलुषित मनसुबे लक्षात आल्यामुळे तरुणीने कुटुंबीयांकडे आणि नंतर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याच्या बनवाबनवीची चक्रावून टाकणारी माहिती उघड झाली.
एखाद्या सिनेमाची स्क्रिप्ट शोभावी असे हे प्रकरण गिट्टीखदान ठाण्यात तक्रारीच्या रूपाने आले आहे. आशिष अशोकराव गायधने (वय २३) हा सक्करदऱ्यातील सोमवारी क्वॉर्टर्समध्ये राहतो. तो अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे. महिनाभरापूर्वी तो एका वधू-वर परिचय मेळाव्यात गेला. तेथे त्याने अनेक अविवाहित तरुणींची माहिती काढली.
सारीच बनवाबनवी
प्रीती आणि तिच्या कुटुंबीयांनी निखिल देवतळेचा भाऊ, वडील यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न केले. प्रत्येक वेळी एकच जण बोलत असल्याचे लक्षात आल्याने त्यांचा संशय वाढला. नंतर त्यांनी आरोपीचा पत्ता तपासला. त्यातही समाधानकारक माहिती न मिळाल्यामुळे प्रीतीने आपल्या कुटुंबीयांसोबत गिट्टीखदान पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तक्रार नोंदवून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत प्रीतीला लग्नाची मागणी घालणारा निखिल देवतळे नसून आशिष गायधने असल्याचे उघड झाले. प्रीतीच्या कुटुंबीयांसोबत निखिल किंवा त्याचे नातेवाईक बोलत नव्हते, तो कोणत्याच जॉबवर नाही अन् घरचाही साधारण असून, अभियांत्रिकीचा विद्यार्थी असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याला विनयभंग आणि फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली.