राज जे करतो ते पराकोटीचे - नाना पाटेकर

By admin | Published: December 28, 2016 10:11 AM2016-12-28T10:11:47+5:302016-12-28T10:11:47+5:30

नाना पाटेकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.

What the King does is brilliant - Nana Patekar | राज जे करतो ते पराकोटीचे - नाना पाटेकर

राज जे करतो ते पराकोटीचे - नाना पाटेकर

Next

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 28 - नाशिक शहरात मनसेने केलेल्या कामागिरीला ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी पोचपावती दिली आहे. राज जे करतो ते पराकोटीचे चांगले असते, असे म्हणत नाना यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. 
नाशिकमध्ये पांडवलेणीच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या बोटॅनिकल गार्डनचा लोकापर्ण सोहळ्यावेळी नाना पाटेकर बोलत होते. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांचे कौतुक केले.  
 
'माणूस म्हणून मी राज तुमचा आभारी आहे. खूप छान काम केले.  कुठल्या शहरात तू निवडून आला तर बर होईल. अशी छान काम तिथेही होतील', असे सांगत नाना यांनी नाशिकमधील मनसेच्या कामाची स्तुती केली.  दरम्यान, याच सोहळ्यावेळी राज ठाकरे यांनी अरबी समुद्रात उभारण्यात येणा-या शिवाजी महाराज यांच्या स्मारकावरुन पुन्हा टीकास्त्र सोडले. 'स्मारकाच्या माझ्या संकल्पना वेगळ्या असतात, पुतळे उभारणे म्हणजे स्मारक नव्हे', असा टोला राज यांनी राज्य सरकारला हाणला आहे. 

Web Title: What the King does is brilliant - Nana Patekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.