बाजीरावला नाचताना दाखवलं म्हणून आक्षेप का ? - भन्साळी
By admin | Published: December 17, 2015 02:28 PM2015-12-17T14:28:54+5:302015-12-17T14:49:00+5:30
संजय लीला भन्साळी यांनी 'बाजीराव-मस्तानी' चित्रपटातील 'पिंगा' या गाण्यावर बाजीरावची पत्नी काशीबाई आणि मस्तानीच्या एकत्र नृत्याचे समर्थन केले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - संजय लीला भन्साळी यांनी 'बाजीराव-मस्तानी' चित्रपटातील 'पिंगा' या गाण्यावर बाजीरावची पत्नी काशीबाई आणि मस्तानीच्या एकत्र नृत्याचे तसेच बाजीरावला सैनिकांसोबत नाचताना दाखवण्याचे समर्थन केले आहे.
बाजीराव राजा नव्हता तो एक महान योद्धा होता. तो सैनिकांसोबत रहायचा आणि युद्धात विजय मिळवल्यावर ते विजय साजरे करायचा. मी ते सेलिब्रेशन नृत्य आणि गाण्यातून दाखवले असेल तर, लोकांना त्यावर आक्षेप का आहे ? त्याकडे इतक्या विचित्र पद्धतीने का पाहिले जातेय ? असे प्रश्न भन्साळींनी टीकाकारांना विचारले आहेत.
यापूर्वी बाजीरावच्या जीवनावर इतक्या मोठया स्तरावर चित्रपट झालेला नाही. विरोध करणा-या काही लोकांना सोडा, इतरांना या चित्रपटामागचा अर्थ समजेल. माझे चित्रपट संगीतमय असतात म्हणून त्यात नृत्य आणि गाणी आहेत. पण ही नृत्य आणि गाणी चित्रपटात कोणाच्या भावना दुखावण्यासाठी टाकण्यात आलेली नाहीत असे स्पष्टीकरण भन्साळींनी दिले.