अमेरिकेत हिंदुस्थानींचेच शिरकाण का ?, प्रे. ट्रम्प उत्तर द्या !

By admin | Published: March 7, 2017 06:54 AM2017-03-07T06:54:53+5:302017-03-07T07:32:02+5:30

अमेरिकेत भारतीय नागरिकांवर सातत्यानं होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सामनाच्या अग्रलेखातून खडे बोल सुनावले आहेत.

What is the presence of Hindusthanians in America? Reply Trump! | अमेरिकेत हिंदुस्थानींचेच शिरकाण का ?, प्रे. ट्रम्प उत्तर द्या !

अमेरिकेत हिंदुस्थानींचेच शिरकाण का ?, प्रे. ट्रम्प उत्तर द्या !

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - अमेरिकेत भारतीय नागरिकांवर सातत्यानं होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सामनाच्या अग्रलेखातून खडे बोल सुनावण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेश निवडणुका जिंकण्यासाठी काशीत रस्त्यावर उतरले आहेत. पण तिकडे अमेरिकेत हिंदुस्थानी वंशाच्या लोकांना रस्त्यावर गोळ्या घालून मारले जात आहे. बिगर अमेरिकन नागरिकांवर हल्ले होऊ लागले आहेत. मात्र प्रश्न असा आहे की, फक्त हिंदुस्थानी वंशाच्याच लोकांचे शिरकाण का सुरू आहे?, असा सवाल उपस्थित करत सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान मोदींसह डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शरसंधाण साधण्यात आलं आहे.
अमेरिकेतील हिंदुस्थानी वंशाच्या लोकांत सध्या दहशत आहे आणि दिल्लीच्या भाजप सरकारने त्यावर दुःख आणि चिंता व्यक्त केली आहे. नुसत्या चिंतेचे उसासे सोडून काय होणार ?, खासकरून तेथील पटेल, शहा वगैरे मंडळींनी तर ट्रम्प हे अमेरिकेचे मोदी असून ते हिंदुस्थानप्रमाणेच अमेरिकेतही अच्छे दिन आणतील, असा जोरदार प्रचार केला होता. ट्रम्प यांनीही हिंदुस्थानींच्या मेळाव्यात मोदी व अच्छे दिन यांचे हिंदी भाषेत कौतुक केले, पण आता सगळ्यांत जास्त फटका हिंदुस्थानींनाच बसत आहे व ट्रम्प आल्यापासून अमेरिकेतील अनेक परगण्यांत हिंदुस्थानींच्या रक्ताचे सडे पडत आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.

सामनाच्या अग्रलेखातील ठळक मुद्दे
- ट्रम्प यांनी निवडून येण्याआधी जी आश्वासने दिली होती त्यांच्या नेमके उलटेच घडताना दिसत आहे. निवडून येताच अमेरिकेतील मुसलमानांवर कठोर निर्बंध लादू व त्यांना बाहेरचा रस्ता दाखवू अशी भाषा ट्रम्प यांनी केली होती, पण मुसलमान मजेत आहेत व तेथील हिंदूंनाच भयंकर जाच सहन करावा लागत आहे.
- गेल्या दहा दिवसांत तीन वेळा हिंदुस्थानींवर हल्ले झाले. त्यात दोघांचा मृत्यू झाला. श्रीनिवास कुचिभोट या हिंदुस्थानी इंजिनीअरची हत्या कन्सास येथे झाली. हर्नीश पटेल या दुकानदाराची हत्या लँकस्टर कौंटी भागात झाली.
- वॉशिंग्टनच्या केन्ट भागातील शीख समुदायाचे दीप राय यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. शिखांवर अमेरिकेत याआधीही हल्ले झाले. अगदी गुरुद्वारात घुसून असे हल्ले झाले आहेत. मात्र आता सर्वच हिंदुस्थानी नागरिकांना सर्रास लक्ष्य केले जात आहे. तुमच्या देशात चालते व्हा असा आरडाओरडा करायचा आणि हिंदुस्थानी व्यक्तीवर गोळ्या झाडायच्या, त्याच्यावर हल्ला करायचा असे प्रकार अमेरिकेत सर्वदूर होऊ लागले आहेत.
- अमेरिकेत नव्याने वाढीस लागलेल्या या हेट क्राइमचा अलीकडचा पहिला बळी ठरलेल्या श्रीनिवास कुचिभोट यांच्या पत्नीने तर प्रेसिडेंट ट्रम्प यांना आम्ही हिंदुस्थानींनी अमेरिकेत राहायचे की नाही? असा थेटच प्रश्न विचारला आहे. गंभीर बाब म्हणजे या प्रश्नावर ट्रम्प प्रशासनाने गुळमुळीत उत्तर दिले
- अमेरिकेतील हिंदुस्थानींवरील हल्ले वर्णद्वेषातून होत आहेत हे आता मान्य केले पाहिजे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत फक्त अमेरिकी नागरिकांनाच प्राधान्य देण्याची घोषणा केली तेव्हापासून अमेरिकेतील सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे.
- अमेरिकेची सामाजिक रचना ही संमिश्र असून, येथे मूळ अमेरिकन कमी व जगभरातून आलेल्या लोकांनीच अमेरिका निर्माण केली. स्वतः ओबामा, हेन्री किसिंजरसारख्यांचे मूळ आणि कूळ इतर देशांतले आहे. त्यामुळे इतरांनी चालते व्हावे, असे फर्मान ट्रम्प यांनी काढलेच तर संपूर्ण अमेरिका ओकीबोकी होऊन जाईल.
- अमेरिकेतील दहशतवादी कृत्यांमागे कोण आहे व त्या दहशतवादाची सूत्रे पाकिस्तानातून कशी हलवली जातात हे ट्रम्प यांना माहीत आहे. त्या पाकिस्तानशी अमेरिका लढत नसून हिंदुस्थानचे सैन्य लढत आहे हे ट्रम्प यांनी त्यांच्या जनतेला समजावून सांगायला हवे.
- आमच्यासाठी हिंदुस्थानी बहुमोल आहेत, असे कन्सासच्या गव्हर्नरांनी आता सांगितले, ते योग्यच आहे, पण मग अमेरिकेत त्या बहुमोल हिंदुस्थानींचे बळी का जात आहेत? त्यांचे रक्त का सांडत आहे?

Web Title: What is the presence of Hindusthanians in America? Reply Trump!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.