विधानसभेच्या जाहीरनाम्यात काय मुद्दे असावे?; भाजपने मागविल्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 08:11 AM2024-10-05T08:11:18+5:302024-10-05T08:11:34+5:30

विविध समित्यांची केली स्थापना; मविआविरुद्ध आरोपपत्र तयार करणार

What should be the issues in the Manifesto of the maharashtra Assembly election?; BJP asked for suggestions | विधानसभेच्या जाहीरनाम्यात काय मुद्दे असावे?; भाजपने मागविल्या सूचना

विधानसभेच्या जाहीरनाम्यात काय मुद्दे असावे?; भाजपने मागविल्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या विविध समित्यांची घोषणा निवडणूक संचालन समितीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. 

आगामी निवडणुकीसाठी पक्षाच्या जाहीरनाम्यात कोणते मुद्दे असावेत यासाठी पक्षाने नागरिकांकडून सूचना मागविल्या आहेत. 
 जाहीरनामा समितीचे अध्यक्ष वनमंत्री सुधीर मुनगंटीवार असतील. जनतेच्या इच्छा-आकांक्षांचे प्रतिबिंब जाहीरनाम्यात उमटावे यासाठी जनतेकडूनच त्यांनी सूचना मागविल्या आहेत, त्यातील निवडक सूचनांचा जाहीरनाम्यात समावेश करण्यात येईल. मविआविरुद्ध आरोपपत्र तयार करण्यासाठीही समिती नेमण्यात आली आहे. 

 दानवे म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारची अव्वल कामगिरी, पक्ष संघटनेच्या बळावर विधानसभा निवडणूक जिंकण्याचा निर्धार भाजपने केला आहे. २० समित्यांची स्थापना केली आहे. मुख्य प्रदेश समितीचे दानवे अध्यक्ष असून दिलीप कांबळे, अशोक नेते, श्रीकांत भारतीय हे सहसंयोजक आहेत.

असे आहेत विविध समित्यांचे संयोजक  
जाहीरनामा -  सुधीर मुनगंटीवार
विशेष संपर्क - चंद्रकांत पाटील 
सामाजिक संपर्क - पंकजा मुंडे 
nमहिला संपर्क - विजया रहाटकर 
nकृषी क्षेत्र - अशोक चव्हाण 
nलाभार्थी संपर्क - राधाकृष्ण विखे 
nमहायुती निवडणूक अभियान समन्वय -  गिरीश महाजन 
nयुवा संपर्क - केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे 
nग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था संपर्क - केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ 
nप्रचार यंत्रणा - रवींद्र चव्हाण 
nसहकार क्षेत्र संपर्क - प्रवीण दरेकर 
nअनुसूचित जाती संपर्क - भाई गिरकर 
nअनुसूचित जमाती संपर्क - 
डॉ. विजयकुमार गावीत 
nसोशल मीडिया आयटी -
निरंजन डावखरे 
nप्रसारमाध्यमे  संपर्क -
अतुल भातखळकर, 
nशहरी स्थानिक स्वराज्य संस्था संपर्क -  प्रसाद लाड 

Web Title: What should be the issues in the Manifesto of the maharashtra Assembly election?; BJP asked for suggestions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.