‘राज्य सरकारचं काम काय... शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाय’

By admin | Published: June 5, 2017 12:54 AM2017-06-05T00:54:22+5:302017-06-05T00:54:22+5:30

शासनाच्या निषेधार्थ व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि. ५) जेजुरी व पंचक्रोशी बंदचे आवाहन किसान मोर्चा जेजुरी व पंचक्रोशीने केले आहे

'What is the state government's work ... the butter on the scalp of the farmer' | ‘राज्य सरकारचं काम काय... शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाय’

‘राज्य सरकारचं काम काय... शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाय’

Next

जेजुरी : शासनाच्या निषेधार्थ व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि. ५) जेजुरी व पंचक्रोशी बंदचे आवाहन किसान मोर्चा जेजुरी व पंचक्रोशीने केले आहे. आज सकाळी ११ वाजता किसान मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जेजुरी येथील शिवाजी चौकात दुधाचा टँकर अडवून त्यातील दूध रस्त्यावर सोडून दिले. किसान मोर्चाच्या वतीने जेजुरी व पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सर्व गावांनी बंद पाळण्याचा निर्णय या बैठकीत घेतला. याबाबतचे निवेदन जेजुरी पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे. किसान मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी भाजीबाजार व जेजुरी शहरात फेरी काढून बंदला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले. तसेच या वेळी कार्यकर्त्यांनी जेजुरी येथील शिवाजी चौकातून पुण्याकडे जाणारा दिगंबर मिल्कचा दुधाचा टँकर अडवून त्यातील काही दूध रस्त्यावर सोडून दिले. किसान मोर्चाच्या बैठकीला माणिक झेंडे पाटील, संदीप जगताप, व्यंकटराव गरुड, हनुमंत काळाने, मुरलीधर काळाने, महादेव शेंडकर, सुकुमार भामे, अभिजित जगताप, संतोष उबाळे, रुपेश इंदलकर, तारीफ पानसरे, विठ्ठल सोनवणे, ज्ञानोबा जाधव आदी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
फोटो मेल केले आहेत ................
जेजुरीत शेतकऱ्यांची बैठक.
दुधाचा टँकर अडवून दूध ओतून देताना.
>इंदापुरात आठवडेबाजार बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदापूर : शेतकरी संपाच्या चौथ्या दिवशी रविवारी शहरातील रविवारचा आठवडेबाजार, भाजीमंडई बंद ठेवण्यात आली होती. माळवाडी नंबर दोनच्या युवा शेतकऱ्यांनी शहरातील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दूध व शेतीमाल ओतून दिला.
इंदापूरमधील आठवडेबाजार तालुक्यातील मोठ्या बाजारांमध्ये मोडतो. उजनी पाणलोटक्षेत्र, निमगाव केतकी, बिजवडीच्या तरकारी पट्ट्यातील शेतकऱ्यांचा शेतीमाल विक्रीस येतो. हजारो रुपयांची उलाढाल होते. हा आठवडेबाजार बंद ठेवण्याचे आवाहन दि. २ जूनला शेतकरी संघटनेने केले होते. आज सकाळी मोजकेच शेतकरी विक्रीसाठी शेतमाल घेऊन आले. तेवढ्यात शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते गुलाबराव फलफले, किरण बोरा, हरिदास पवार, सुहास दिवसे, दत्तू पवार, विजय हजारे, अभिजित काळे, पांचा भोसले, सचिन पवार, खाक्या काळे आदी तेथे आले. त्यांनी बाजार बंदला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले. त्या आवाहनास प्रतिसाद दिला.
>आठवडेबाजार भरलेच नाहीत...
आळेफाटा कांदा बाजार भरलाच नाही
आळेफाटा : आळेफाटा उपबाजारात कांदा विक्रीस न आणता संप सुरूच ठेवला. यामुळे उपबाजारात शुकशुकाट होता. तसेच परिसरातील दूध संकलन केंद्रेही चौथ्या दिवशी बंदच होती. रविवारच्या आळेफाटा उपबाजारात शेतकरीवर्गाने कांदा विक्रीस न आणल्याने तेथेही शुकशुकाट होता. दुपारच्या दरम्यान चौकात आजही आळेफाटा पोलिसांनी बंदोबस्त ठेवला़
उरुळी कांचन शेतकरी कृती समितीची गांधीगिरी
उरुळी कांचन :उरुळी कांचन येथील आठवडे बाजारामध्ये शेतमाल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना गांधीगिरी करत गुलाबपुष्प देऊन शेतकऱ्यांच्या संपामध्ये सहभागी होण्याचे आवाहन उरुळी कांचन शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात आले. या वेळी हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजाराम कांचन, माजी उपसरपंच युवराज कांचन, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब लक्ष्मण कांचन, तंटामुक्ती समिती अध्यक्ष अमित कांचन, गणपत कड, दत्ता तुपे, देविदास कांचन, मनसे शहरप्रमुख विजय मुरकुटे, प्रसाद कांचन यांनी व्यापाऱ्यांना गांधीगिरीने गुलाबपुष्प देऊन संपामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
व्यापाऱ्यांनी पाठिंबा देत मंचरला बाजार बंद
मंचर : आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील प्रसिद्ध असलेला रविवारचा बाजार बंद ठेवून या शेतकरी संपास मंचर ग्रामस्थांनी सक्रिय पाठिंबा दिला आहे. मंचर येथे रविवारी भरणारा आठवडेबाजार हा तालुक्यात खूपच प्रसिद्ध आहे. अनेक शेतकरी, व्यापारी आपला भाजीपाला विक्रीसाठी बाजारात घेऊन येत असतात. प्रचंड मोठ्या प्रमाणावर या बाजारात आर्थिक उलाढाली होतात. मंचर ग्रामस्थांच्या या आवाहनाला सर्वांनी प्रतिसाद देत बाजार बंद ठेवून शेतकऱ्यांच्या संपास सक्रिय पाठिंबा दर्शविला. बाजार
बंद असल्याने नेहमीच गजबजाट असलेल्या या परिसरात आज पूर्णपणे शुकशुकाट जाणवत होता.
बंदोबस्तात शिक्रापूरचा बाजार
शिक्रापूर : शिक्रापूर येथे दर रविवारी भरविला जाणारा आठवडेबाजार शेतकरी संपामुळे बंद ठेवण्यात आला होता; परंतु किरकोळ व्यापारी येथे बाजारात आले व बंद असलेला आठवडेबाजार सकाळी दहानंतर पोलीस बंदोबस्तामध्ये सुरू करण्यात आला, मात्र शेतकऱ्यांनी आजच्या बाजाराकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून आले. प्रत्येक रविवारी सकाळी सात वाजता सुरू होत असलेल्या या बाजारामध्ये आज किंचित लोक व व्यापारी दिसून येत होते. परंतु हा बाजार बंद असल्याचे अनेकांनी सांगितल्याने बाजाराकडे जास्त कुणी फिरकले नाही. यानंतर तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये, म्हणून शिक्रापूर पोलिसांच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला. त्यानंतर दुपारनंतर बाजार काहीसा सुरळीतपणे सुरू झाला.
आठवडेबाजार आज बंदमुळे
व्यापारी गेले परत
केडगाव : शेतकरी संपाला प्रतिसाद म्हणुन खुटबाव येथील रविवारी होणारा आठवडे बाजार ग्रामस्थांनी उस्फुर्तपणे बंद ठेवला. आज सकाळी ७ च्या सुमारास व्यापारी बाजारमैदानात दाखल झाले तेव्हा ग्रामस्थांनी व्यापाऱ्यांना आठवडेबाजार आज बंद राहणार असल्याचे सांगितले. सदर सुचना मिळाल्यानंतर व्यापाऱ्यांनी परत माघारी जाणे पसंद केले. ग्रामस्थांनी सर्व व्यापायार्साठी चहापान केले. यावेळी सरपंच शिवाजी थोरात,तंटामुक्ती अध्यक्ष दिगांबर थोरात,नानासाहेब थोरात, वाल्मिक थोरात, रामभाऊ थोरात,अशोक थोरात, एकनाथ थोरात, भाऊसाहेब शितकल, मोहन चव्हाण आदी शेतकरी उपस्थित होते.
...सणसरचा आठवडेबाजार बंद
सध्या सुुरू असलेल्या शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर सणसर (ता. इंदापूर) येथील आठवडेबाजार बंद ठेवण्यात आला. त्यामुळे येथील बाजार मैदान ओस पडले होते. ग्रामपंचायतीने यापूर्वीच आठवडेबाजार बंद ठेवणार असल्याचे जाहीर केल्याने विक्रेते आज इकडे फिरकले नाहीत.

Web Title: 'What is the state government's work ... the butter on the scalp of the farmer'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.