बदलापुरातील उद्रेकावेळी सरकारनं काय-काय पावलं उचलली? खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगिलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 12:44 PM2024-08-21T12:44:43+5:302024-08-21T12:45:19+5:30

बदलापुरमधील उद्रेकावेळी, सरकारकडून काय-काय पावले उचलण्यात आली? यासंदर्भात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे.

What steps did the government take during the Badlapur outbreak Chief Minister Eknath Shinde himself said | बदलापुरातील उद्रेकावेळी सरकारनं काय-काय पावलं उचलली? खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगिलं

बदलापुरातील उद्रेकावेळी सरकारनं काय-काय पावलं उचलली? खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगिलं

बदलापूरमधील आदर्श विद्यालय शाळेत शिशू वर्गातील दोन विद्यार्थिंनीवरील कर्मचाऱ्याच्या कथित अत्याचाराच्या घटनेवरून मंगळवारी नागरिकांनी जोरदार आंदोलन केले. शाळेच्या प्रवेशद्वारापासून सुरू झालेले हे आंदोलन थेट बदलापूर रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचले. साधारणपणे 8-9 तास चाललेल्या या आंदोलनामुळे सायंकाळी जवळपास 6 वाजेपर्यंत रेल्वे वाहतूक ठप्प होती. बदलापुरमधील या उद्रेकावेळी, सरकारकडून काय-काय पावले उचलण्यात आली? यासंदर्भात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे.  

मुख्यमंत्री शिंदे आज सातारा दौऱ्यावर आहेत. येवेळी माध्यमांसोबत बोलताना ते म्हणाले, "सरकारची भूमिका मी कालच स्पष्ट केली आहे. झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद आहे. एक बच्चू आहे. त्याच्या संदर्भात जे काही प्रकरण घडले आहे. ते दुर्दैनी आहे. त्यामुळे जे कुणी आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी. असे निर्देश मी कालच सीपींना दिले आहेत. त्याप्रमाणे त्यावर कामही सुरू आहे. त्याला (आरोपीला) अटकही झाली आहे. त्याच्यावर अटेम्प टू रेप, पोक्सो असे कठोरात कठोर कलमं लावण्याचे निर्देश आम्ही दिले आहेत. ही केस फास्ट्रॅकवर घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. यासाठी एक स्पेशल पीपी आम्ही लावत आहोत. एसआयटी नेमण्यात आली आहे."

'त्या कुटुंबामागे सरकार पूर्णपणे उभे' -
"लोकांनी म्हटले आहे की, पोलिसांनी दिरंगाई केली, तर पोलिसांवरही कारवाई करण्यात आली. तेथील स्थानिक वरिष्ठ पोलीस नीरिक्षक आणि इतर अधिकारी यांनाही निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे त्या कुटुंबामागे सरकार पूर्णपणे उभे आहे. सरकार त्या कुटुंबाला पूर्णपणे सहकार्य करेल. मी संस्थाचालकांवरही कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मुलींना हँडलिंग करण्यासाठी तेथे मुलीच असायला हव्यात, महिलाच असायला हव्यात. हे नियम जे कुणी संस्थाचालक पाळत नसतील त्यांच्यावरही कारवाई करण्याच्या सूचना मी शिक्षणमंत्री केसरकर यांना दिल्या आहेत. त्यांनीही त्या ठिकाणी जाऊन भेट दिली आहे. गिरिष महाजन यांनीही त्या ठिकाणी व्हिजिट केली," अशी माहितीही शिंदे यांनी दिली.

..आणि पुन्हा अशा प्रकारचे कृत्त करायला कुणी धजावणार नाही -
"अशा प्रकारची दुर्घटना भविष्यात होऊ नये यासाठी, जे काही नियम आहेत, ते आणखी कडक करता येतील. ज्या ठिकाणी मुली शिक्षण घेत आहेत, तेथे जादाची काळजी घेण्याच्या सूचना आम्ही दिल्या आहेत. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत म्हणून, याला फास्ट्रॅक घेऊन, याच्यावर कठोर कारवाई, कठोर शिक्षा झाली की, एक संदेस जाईल आणि पुन्हा अशा प्रकारचे कृत्त करायला कुणी धजावणार नाही," असेही शिंदे यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: What steps did the government take during the Badlapur outbreak Chief Minister Eknath Shinde himself said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.