मलालाला दिलेल्या ‘नोबेल’ची किंमत ती काय?
By admin | Published: May 1, 2016 01:13 AM2016-05-01T01:13:38+5:302016-05-01T01:13:38+5:30
अवघ्या १६ वर्षांच्या मलाला या मुलीला शांततेचा नोबेल पुरस्कार दिला. त्याची किंमत काय आहे ? असा कुणालाही दिला गेलेला पुरस्कार जर मला दिला तर मी घेणार नाही, अशी टीका
लातूर : अवघ्या १६ वर्षांच्या मलाला या मुलीला शांततेचा नोबेल पुरस्कार दिला. त्याची किंमत काय आहे ? असा कुणालाही दिला गेलेला पुरस्कार जर मला दिला तर मी घेणार नाही, अशी टीका ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी शनिवारी येथे केली.
लातुरमधील विविध संस्थांच्या वतीने मांजरा नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामाला भेट देण्यासाठी ते आले होते. यावेळी ‘एमबीएफ’च्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, मलाला या १६ वर्षाच्या मुलीचे कर्तृत्वच काय? अशा मुलीला नोबेल देऊन पुरस्काराची पत गेली. त्यामुळे आता हा पुरस्कार जरी मला मिळाला तरी मी तो घेणार नाही. मी कोणत्याही पुरस्कारासाठी काम करीत नाही. तो पुरस्कार राजकीय झाला आहे. काम करुनही पुरस्कार मिळेल याची खात्री नाही. माझ्याकडे काही लोक आले होते. परंतु मी या पुरस्काराच्या राजकारणात पडू इच्छित नाही.
सिंचनासाठी खूप प्रकल्प झाले, त्या पाण्यावर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार. मात्र तसे होत नाही, असे सांगून रवीशंकर म्हणाले की, नद्याचे पुनरुज्जीवन आणि नद्याजोड हे दोन मुख्य कामे सरकारने हाती घ्यायला हवीत. नद्या या देशाच्या आणि शेतकऱ्यांच्या नाड्या आहेत. त्या जोडल्या तर हरितक्रांती दूर नाही. हीच बाब ओळखून आम्ही नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष काम करीत आहोत. महाराष्ट्रात यापूर्वी १६ नद्यांचे पुनरुज्जीवन केले आहे. लातूर जिल्ह्यातील मांजरा नदी १७ वी आहे. यापूर्वी या जिल्ह्यात ‘आर्ट आॅफ लिव्हींग’ने घरणी आणि तावरजा नदीवर काम केले. शासनाने हे काम केले असते तर किमान दहा वर्षे लागले असते. परंतु लोकसहभागामुळे हे लवकर होत आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या चिंतेची बाब असल्याचे सांगून ते म्हणाले, देवावरचा आणि समाजावरचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे शेतकरी खचून आत्महत्या करीत आहे. यासाठी शेतकऱ्यांना बळ देणे आवश्यक आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत, हे समाजाने त्यांना सांगितले पाहीजे. आर्ट आॅफ लिव्हींगच्या वतीने आम्ही हे करीत असून तन, मन आणि धन यासाठी देत आहोत. (प्रतिनिधी)
फक्त मने प्रदूषित झाली!
आम्ही यमुनेच्या पात्रात कार्यक्रमात घेतला. अनेकांनी आरोप केले की नदीचे प्रदूषण झाले. आमचे आव्हान आहे की, शास्त्रीय पध्दतीने
कुणीही आम्हाला सिध्द करुन दाखवावे की हवा, पाणी आणि मातीचे प्रदूषण झाले? आम्ही कोणत्याही कारवाईला सामोरे जाऊ. पण
आमच्या कार्यक्रमामुळे मात्र काहींची मने प्रदूषित झाल्याचे
श्री श्री रविशंकर यांनी सांगितले.