मंत्रिपद मागण्यात चूक ते काय? - विनायक मेटे

By admin | Published: May 10, 2016 03:05 AM2016-05-10T03:05:57+5:302016-05-10T03:05:57+5:30

मी नि:स्वार्थ हेतूने राजकारणात आलेलो नाही. मला मंत्रीपदाचे आश्वासन दिले होते. ते भाजपाने पाळलेले नाही. त्यामुळे आम्ही नाराज आहोत

What is wrong with seeking a minister? - Vinayak Mete | मंत्रिपद मागण्यात चूक ते काय? - विनायक मेटे

मंत्रिपद मागण्यात चूक ते काय? - विनायक मेटे

Next

बदलापूर : मी नि:स्वार्थ हेतूने राजकारणात आलेलो नाही. मला मंत्रीपदाचे आश्वासन दिले होते. ते भाजपाने पाळलेले नाही. त्यामुळे आम्ही नाराज आहोत. मंत्रीपद मागणे चुकीचे नाही. राजकीय कार्यकर्त्यांनी मंत्रीपदाची अपेक्षा ठेवू नये, तर मग कोणी ठेवावी, असा सवाल शिवसंग्रामचे नेते आणि स्मारक समितीचे प्रमुख विनायक मेटे यांनी येथे केला. ऐतिहासिक शिवजयंतीच्या उद्घाटनासाठी मेटे बदलापुरात आले होते. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपाने सत्तेवर येताच अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा प्रश्न प्राधान्याने हाती घेतला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते भूमिपूजन व्हावे, या हट्टामुळे अनेक महिन्यांपासून शिवस्मारकाचे भूमिपूजन रखडले होते. २२ मे रोजी हा भूमिपूजन समारंभ होणार होता. त्यासाठी वानखेडे स्टेडिअमचेही नाहरकत प्रमाणपत्र घेण्यात आले होते. मात्र, राज्यात सध्या भीषण पाणीटंचाई आणि दुष्काळ असल्याने भूमिपूजनाचा कार्यक्र म पुढे ढकलण्यात आला आहे, असे ते म्हणाले.

Web Title: What is wrong with seeking a minister? - Vinayak Mete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.