मुंबई महानगरपालिकचे ऑडिट करा म्हटल्यावर झोंबायचे कारण काय? उदय सावंत यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 01:22 PM2023-12-12T13:22:30+5:302023-12-12T13:24:03+5:30
मुंबई महानगरपालिकेच्या आर्थिक व्यवहारासंदर्भात उदय सामंत म्हणाले, काल जी समिती स्थापन करण्यात आलेली आहे. ती समिती आर्थिक व्यवहाराची सविस्तर चौकशी करेल आणि श्वेतपत्रिका काढण्याचे देखील काल झालेल्या चर्चेनंतर घेतलेला आहे.
नागपूर : मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या २५ वर्षांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
मुंबई महापालिकेसोबतच नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे या सर्व महापालिकांचेही ऑडिट करा, अशी मागणी ठाकरेकडून होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुंबई महानगरपालिकचे ऑडिट करा म्हटल्यावर झोंबायचे कारण काय? असा सवाल मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटला केला आहे.
"सभागृहाच्या बाहेर या सर्व गोष्टी आहेत. बीएमसीचे ऑडिट करावे, असे सांगितल्यानंतर ऐवढे झोंबायचे काही कारण नाही ना? मुंबईचे ऑडिट योग्य आहे की अयोग्य आहे. याची श्वेतपत्रिका आम्ही सरकार म्हणून जाहीर करणार आहोत. एवढ्या कश्याला मिर्चा झोंबल्या पाहिजेत. ज्यावेळी, पुणे, नागपूर, ठाणे, करायची असेल तेव्हा करू. कोव्हिड काळात जे घोटाळे झाले आहेत. ते आपल्यासमोर आहे, त्यावर मी शेरे मारलेले नाहीत. त्यामुळे कुठेही काही झाले तरी ही महानगरपालिका तपासा आणि ठाणे तपासा, अस म्हटलं जातंय. तर आम्ही तपासांच्यावेळी तपासू. जी आता तपासायचे ठरवलेले आहे. ते पहिले तपासू", असे उदय सामंत म्हणाले.
मुंबई महानगरपालिकेच्या आर्थिक व्यवहारासंदर्भात उदय सामंत म्हणाले, "काल जी समिती स्थापन करण्यात आलेली आहे. ती समिती आर्थिक व्यवहाराची सविस्तर चौकशी करेल आणि श्वेतपत्रिका काढण्याचे देखील काल झालेल्या चर्चेनंतर घेतलेला आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये आर्थिक परिस्थिती काय आहे. कशा पद्धतीने आर्थिक व्यवहार झालेले आहेत. यासंदर्भातील चौकशी केली जाईल. पुढच्या अधिवेशनात किंवा त्याआसपासमध्ये वाईट पेपर करण्याच्या निर्देश मी काल सभागृहात दिलेले आहेत."
दरम्यान, सरकारने मुंबई महानगरपालिकेचे ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, मुंबई महापालिकेचे ऑडिट होणार असेल तर नक्कीच करा, सोबतच नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे या सर्व महापालिकांचेही ऑडिट करा. याशिवाय नगर विकास विभागाच्या गेल्या दीड वर्षांतील कारभाराचे आणि व्यवहाराचेही ऑडिट करा, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.