WhatsAPP वर हल्ला, कृषिमंत्र्यांचेही अकाऊंट हॅक! माणिकराव कोकाटे यांना बसला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 09:03 IST2025-02-05T09:02:37+5:302025-02-05T09:03:51+5:30

WhatsAPP Hacked Cases: या सायबर हल्ल्यात जवळपास ९० लोक जाळ्यात अडकल्याचे मेटाने सांगितले आहे. त्यात पत्रकार आणि अनेक मोठे व्यक्ती यांचा समावेश आहे.

WhatsApp attacked, Agriculture Minister's account hacked! Agriculture Minister Kokate also hit | WhatsAPP वर हल्ला, कृषिमंत्र्यांचेही अकाऊंट हॅक! माणिकराव कोकाटे यांना बसला फटका

WhatsAPP वर हल्ला, कृषिमंत्र्यांचेही अकाऊंट हॅक! माणिकराव कोकाटे यांना बसला फटका

WhatsAPP Hacked: राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे व्हॉटस अ‍ॅप मंगळवारी सकाळी हॅक झाले. जगभरात अनेकांचे व्हॉटस अ‍ॅप (WhatsAPP Hacked) असेच हॅक होत असून, यासाठी झीरो क्लिक टेक्निकचा वापर करण्यात आला असल्याचे मेटाने म्हटले आहे.

मंत्रालयात कॅबिनेट बैठकीसाठी कोकाटे उपस्थित होते. त्याच सुमारास हा प्रकार समोर आला. त्यांनी 'एक्स' या सोशल माध्यमावर पोस्ट करून त्यासंदर्भात माहिती दिली आहे. व्हॉटस अ‍ॅप हॅक करण्यात आले असून माझ्या व्हॉटस अ‍ॅप नंबरवरून येणाऱ्या कोणत्याही लिंकवर किंवा 'एपीके' अ‍ॅप क्लिक ओपन करू नये. 

कृपया सावध राहा आणि अशा कोणत्याही संशयास्पद मेसेजला प्रतिसाद देऊ नका, असे कोकाटे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. या हल्ल्यासाठी पॅरेगॉन सर्विलांस सॉफ्टवेअरचा वापर केला असून ग्राफाईट असे त्याचे नाव आहे. 

या सायबर हल्ल्यात जवळपास ९० लोक जाळ्यात अडकल्याचे मेटाने सांगितले आहे. त्यात पत्रकार आणि अनेक मोठे व्यक्ती यांचा समावेश आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या चॅटवर, लिंकवर तसेच डॉक्युमेंट्सवर क्लिक करू नये, असे आवाहन केले जात आहे.

२५० कोटी जी-मेलना हॅकिंगचा धोका; सेटिंगमधून पासवर्ड तत्काळ बदलण्याचे आवाहन

२५० कोटी जी-मेल वापरकर्त्यांच्या खात्यांना हॅकिंगचा धोका आहे, असा इशारा गुगलने जारी केला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून हॅकर्स खाती हॅक करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे गुगलने या इशाऱ्यात म्हटले आहे.

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, हॅकर्स युजर्सना फोन करून तुमचे खाते हॅक झाल्याचे सांगतात. त्यानंतर ते रिकव्हरी कोड पाठवतात. हे कोड आणि ईमेल खरे असल्यासारखेच दिसतात. त्यामुळे वापरकर्ते सहज फसू शकतात. 

याद्वारे युजरच्या खात्याची सर्व गोपनीय माहिती हॅकर्स पळवू शकतात. चुकून रिकव्हरी कोडचा वापर केला, तर सेटिंगमधून पासवर्ड तत्काळ बदलण्याचे आवाहन गुगलने केले आहे.

झीरो क्लिकचे शिकार

परेगॉन सर्विलांसचे ग्राफाईट सॉफ्टवेअर झीरो क्लिक टेक्निकवर काम करते. त्याचा अर्थ विना क्लिक करता ते तुमच्या डिवाईसमध्ये पोहोचते आणि डेटा चोरी करते. मोबाइल धारकांना या घुसखोरीची कल्पनाही नसते. अशीच एक फाइल कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मोबाइलमध्ये आली आणि त्यांचे अकाऊंट हॅक झाले.

सुरक्षा मजबूत करणार

व्हॉटस अ‍ॅपने पेरेगॉन कंपनीला नोटीस पाठवली असून त्याचबरोबर कंपनी कायदेशीर कारवाई करण्याच्या विचारात आहे.

अशा स्पायवेअर किंवा

व्हायरसपासून युजर्सचे संरक्षण करण्यासाठी व्हॉटस अ‍ॅप आता आपल्या अ‍ॅपची सुरक्षा आणखी मजबूत करण्याच्या दिशेने काम करत आहे.

हॅक होतेय... कसे कळणार?

व्हॉटस अ‍ॅप अकाऊंटमध्ये अनोळखी कॉन्टॅक्ट दिसले तर हे तुमचे व्हॉटस अ‍ॅप अकाऊंट हॅक होण्याची चिन्हे आहेत.

तुमच्या व्हॉटस अ‍ॅप अकाऊंटवरून अनोळखी कॉन्टॅक्टसोबत चॅटिंग केले असेल तर अकाऊंट हॅक झालेले असेल.

व्हॉटस अ‍ॅप अकाऊंटमध्ये लॉग इन करता आले नाही तरी तुमचे अकाऊंट हॅक झालेले असू शकते.

तुमच्या मोबाइल नंबरमध्ये सतत व्हेरिफिकेशन कोड सापडत असतील तर तुमचे व्हॉटस अ‍ॅप अकाऊंट धोक्यात आलेले असू शकते, हे लक्षात ठेवा.

Web Title: WhatsApp attacked, Agriculture Minister's account hacked! Agriculture Minister Kokate also hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.