"बाबरी मशिद पडली तेव्हा तिथं दुर्बिणीनं शोधूनही शिवसैनिक दिसला नाही; असेल तर शिवसेनेनं पुरावा द्यावा”

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 10:24 AM2022-05-05T10:24:32+5:302022-05-05T11:42:44+5:30

भाजप नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बाबरी मशीद पाडल्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेला मोठे आव्हान दिले आहे.

When Babri Masjid was demolished Shiv Sainik was not found even after searching through binoculars says raosaheb danve | "बाबरी मशिद पडली तेव्हा तिथं दुर्बिणीनं शोधूनही शिवसैनिक दिसला नाही; असेल तर शिवसेनेनं पुरावा द्यावा”

"बाबरी मशिद पडली तेव्हा तिथं दुर्बिणीनं शोधूनही शिवसैनिक दिसला नाही; असेल तर शिवसेनेनं पुरावा द्यावा”

Next

राज्यात भाजप आणि शिवसेना यांच्याकडून सातत्याने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. या दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकारण अक्षरशः ढवळून निघत आहे. भाजप हिंदूत्ववादाच्या मुद्यावरून सातत्याने शिवसेनेवर निशाणा साधताना दिसत आहे. यातच आता भाजप नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बाबरी मशीद पाडल्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेला मोठे आव्हान दिले आहे. बाबरी मशीद पडली तेव्हा मी स्वतः आयोध्येत होतो. आम्हाला दुर्बिनीने शोधूनही तेथे एखादा शिवसैनिक दिसला नाही. जर एखादा शिवसैनिक तेथे होता, तर शिवसेनेने एखादा पुरावा दाखवावा, असे दानवे यांनी म्हटले आहे.  

दानवे म्हणाले, "बाबरी मशीद पडली तेव्हा मी स्वतः आयोध्येत होतो. त्या ठिकाणावर होतो. दुर्बिनीने शोधूनही आम्हाला तेथे एखादा शिवसैनिक दिसला नाही. जर एखादा शिवसैनिक तेथे होता, तर त्याचा एखादा पुरावा यांनी (शिवसेनेने) दाखवावा, की तेथे कोणता शिवसैनिक होता. तेथे हे कुणीही आले नाही. मी स्वतः तेथे होतो, गोपिनाथराव मुंड तेथे होते आणि त्यावेळचे भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी होते. शिवसेना नव्हती. आता जे आम्ही केले, त्याचे श्रेय जर हे लाटत असतील, तर या देशातील जनतेला हे समजते, असे भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे." ते एका वृत्तवाहीनीशी बोलत होते.

तत्पूर्वी, देवेंद्र फडणवीस यांनीही, बाबरी मशिदीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देत निशाणा साधला होता. भोंगे काढण्याबाबत अल्टिमेटम दिल्यावर तुम्ही घाबरलात आणि म्हणे बाबरी मशिदीचा ढाचा पाडला गेला, तेव्हा आम्ही तिथे होतो. शिवसेनेचा एकही नेता तेथे नव्हता. आमच्या ३२ नेत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. मी स्वतः तेथे उपस्थित होतो. बदायूच्या सेंट्रल जेलमध्ये १८ दिवस होतो, असे फडणवीस यांनी म्हटले होते.
 

Web Title: When Babri Masjid was demolished Shiv Sainik was not found even after searching through binoculars says raosaheb danve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.