"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 08:58 PM2024-11-14T20:58:32+5:302024-11-14T20:59:27+5:30

भाजप नेते प्रविण दरेकर यांनी, "जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा अशा प्रकारचे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो," असे प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे...

When defeat looms, attempts to set up 'such' a narrative begin Pravin Darekar answer to Supriya Sule | "जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला

"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला

राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सभांनी संपूर्ण राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. नेते मंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांचे वार पलटवार करताना दिसत आहेत. यातच, एका परदेशी व्यक्तीचा संदर्भात देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी इव्हीएम मशिनसंदर्भात गंभीर आरोप केला होता. "एका परदेशी व्यक्तीने फोन करून मशिनमध्ये (इव्हीएम मशिन) गडबड असल्याचे म्हटले आहे. त्यांचे म्हणणे आहे की काही मशिनमध्ये गडबड होऊ शकते. पण मला निवडणूक आयोगावर विश्वास आहे," असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते. यावर आता भाजप नेते प्रविण दरेकर यांनी, "जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा अशा प्रकारचे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो," असे प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

सुप्रियासुळे यांच्या आरोपावर बोलताना दरेकर म्हणाले, "मला वाटते ज्या वेळेला पराभव समोर दिसतो, त्या वेळेला अशा प्रकारचे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो. एक गोष्ट, जसा पाऊस येणार असेल की 'डराव-डराव' बेडूक करतात, म्हणजे आपल्याला पावसाची चाहूल त्या ठिकाणी लागते. तसेच पराभव हा निश्चित झालाय, हे सुप्रिया ताईंना कळून चुकलंय आणि म्हणून आत्तापासूनच पराभवाची कारणमिमांसा करण्याचे त्यांचे सत्र सुरू झाले आहे. निवडणुकीपर्यंत आणखी अशा प्रकारे खोट्या गोष्टी पसरवून, आम्ही पराभूत का झालो? याचे विश्लेषण ते करत बसतील."

काय म्हणाल्या होत्या सुळे? -
सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या, "एका माणसाचा फोन येतो मला. तो कुणीतरी परदेशी आहे. तो सारखं फोन करून म्हणतो की, 'ताई, मशिनमध्ये गडबड आहे, मशिनमध्ये गडबड आहे.' मी त्याला म्हणते, 'मी मशिनमुळेच निवडून आले. मी कसं म्हणणार मशिनमध्ये गडबड आहे?'" 

असं तो माणूस म्हणतोय, मी म्हणत नाही... -
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, "आता खरं खोटं मला माहिती नाही, पण अशी एक कथा चालली आहे की, काही मशिन्समध्ये गडबड करतील. असं तो माणूस म्हणतोय. मी म्हणत नाही. हे 170 सीट येतात, असे म्हणत आहेत, कारण त्यांनी काहीतरी नियोजन केलेले आहे." यानंतर, "माझा अशा गोष्टींवर विश्वास नाही, कारण माझा आजही इलेक्शन कमिशन आणि त्या सगळ्या प्रक्रियेवर विश्वास आहे," असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
 

Web Title: When defeat looms, attempts to set up 'such' a narrative begin Pravin Darekar answer to Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.