महाव्यवस्थापकच गोंधळतात तेव्हा...

By admin | Published: May 6, 2014 09:18 PM2014-05-06T21:18:49+5:302014-05-07T01:26:42+5:30

दिवा-सावंतवाडी ट्रेनला अपघात झाल्याचे अनेक तर्कवितर्क लावण्यात येत असले तरी हा अपघात प्रथमदर्शनी वेल्डिंगच्या समस्येमुळे झाल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनिल कुमार सूद यांनी सांगितले.

When the general manager confuses ... | महाव्यवस्थापकच गोंधळतात तेव्हा...

महाव्यवस्थापकच गोंधळतात तेव्हा...

Next

वेल्डिंगच्या समस्येमुळे अपघात झाल्याच्या वक्तव्यात तीन वेळा बदल


दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनला अपघात


मुंबई - दिवा-सावंतवाडी ट्रेनला अपघात झाल्याचे अनेक तर्कवितर्क लावण्यात येत असले तरी हा अपघात प्रथमदर्शनी वेल्डिंगच्या समस्येमुळे झाल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनिल कुमार सूद यांनी सांगितले. मंगळवारी ते या अपघाताची सविस्तर माहीती देताना पत्रकारांशी बोलत होते. अपघाताबद्दलचे कारण महाव्यवस्थापकाकडून सांगतानाच हा अपघात वेल्डिंगमुळे झाला नसल्याचे पुन्हा सांगत त्याबद्दल तीन वेळा आपले वक्तव्य बदलण्यात आले आणि पुर्ता गोंधळच पत्रकार परीषदेत उडवून दिला. या गोंधळानंतर सुरक्षा आयुक्तांच्या अहवालानंतर ते स्पष्ट होईल, अशी माहीती त्यांच्याकडून त्वरीत देण्यात आली.
दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनला अपघात झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या कारभाराविषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले. यावर बोलताना सूद म्हणाले की, देखभाल आणि दुरुस्ती ही आमच्याकडून कमी होत असल्याचे जरी सांगितले जात असले तरी ते खरे नाही. रेल्वे रुळांची देखभाल ही किमॅनकडून केली जाते. असे अपघात हे किमॅनकडूनच रोखले जावू शकतात. आतापर्यंत त्यांच्याकडून अनेक चांगल्या कामगिरी पार पाडण्यात आल्या असून आपल्या कामात ते ९५ टक्के यशस्वी ठरतात. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण करणे चुकीचे आहे. त्यांच्या २0 टक्के जागा जरी रिक्त असल्या तरी त्या आमच्याकडून भरण्यात येतात. मात्र कालांतराने त्या जागा पुन्हा रिक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले. या पॅसेंजर ट्रेनचा झालेला अपघात हा वेल्डिंग बरोबर नसल्यानेच झाला असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याचे सांगत त्यांनी मानवी चुकांमुळे झालेल्या अपघाताला पुष्टी दिली. मात्र हे सांगताच आम्ही सर्व बाजू तपासत असून हा अपघात वेल्डिंगमधील चुकांमुळेच झाला असेल ते सांगणे कठीण असून सध्या उन्हाळा वाढला असून तापमानातील वाढीमुळे रुळात बदल झाल्याचे सांगत हेदेखिल एक कारण असल्याचे सूद यांनी सांगितले. या दोन कारणांनंतर पुन्हा वेल्डिंग करण्यात चूक झाल्याची शक्यता वर्तवत ज्यांनी हे काम केले त्याचा सत्कार केला पाहिजे, असे आश्चर्यकारक विधान केले आणि एकच गोंधळ उडवून दिला. त्यानंतर सुरक्षा आयुक्तांच्या अहवालानंतरच अपघाताचे कारण स्पष्ट होऊ शकते, असे सांगत दोन महिन्यात हा अहवाल सादर होईल, अशी माहीती त्यांनी दिली.
......................................................

मुख्यमंत्र्यांनाच विचारा...
नागोठणे येथील अपघातस्थळी भेट दिल्यानंतर आणि जखमी रुग्णांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री रेल्वेच्या कारभारावरच प्रश्न उपस्थित केले होते. पश्चिम आणि मध्य रेल्वेमध्ये कामकाजाचा समन्वय नसून त्यामुळे गोंधळ उडत असल्याचे ते म्हणाले होते. याबाबत महाव्यवस्थापक सुनिल कुमार सूद यांना विचारले असता, तुम्ही मुख्यमंत्र्यांनाच विचारा असे त्यांनी पत्रकारांनाच सांगितले.
...........................................

एका वर्षात २६0 वेळा रेल्वे सेवा होते विस्कळीत
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात एका वर्षात जवळपास २५0 ते २६0 रेल्वे सेवा विस्कळीतचे प्रमाण असल्याचे यावेळी सूद यांनी सांगितले. सेवा विस्कळीतचे प्रमाण कमी व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.

Web Title: When the general manager confuses ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.