मंत्रिमंडळ विस्तार कधी? एकनाथ शिंदेंनी दिल्लीतून दिले 'हवे' ते उत्तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 03:32 PM2022-07-09T15:32:29+5:302022-07-09T15:34:32+5:30
औरंगाबादचे नाव संभाजनगर जेव्हा आम्ही आवाज उठविला तेव्हा केले. बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलेले की, अन्याय होत असेल तर पेटून उठा. हे बंड नाहीय, हा उठाव आहे, असे शिंदे म्हणाले.
राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. ही एक सदिच्छा भेट होती, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा नाही. महाराष्ट्राचे तुकडे पाडण्यावरून जी वक्तव्ये केली जात आहेत, ती जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, असे शिंदे म्हणाले.
याचबरोबर मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना त्यांनी आषाढी एकादशी झाल्यावर आम्ही दोघे मुंबईत येऊ, भेटू आणि चर्चा करू. यानंतर तुम्हाला हवे ते उत्तर मिळेल, असे शिंदे म्हणाले. याचबरोबर विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार करणार असल्याचे ते म्हणाले.
पन्नास खोक्यांवरून त्यांनी कसले खोके, मिठाईचे की आणखी कसले, असा सवाल त्यांनी करत आम्ही ५० आमदार आहोत. शिवसैनिक कधीही विकला जात नाही. आम्हाला मोदी शहांचा पाठिंबा आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक नको, याबाबत निवडणूक आयोगाशी चर्चा करू, असे शिंदे म्हणाले.
औरंगाबादचे नाव संभाजनगर जेव्हा आम्ही आवाज उठविला तेव्हा केले. बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलेले की, अन्याय होत असेल तर पेटून उठा. हे बंड नाहीय, हा उठाव आहे, असे शिंदे म्हणाले. तसेच सभागृहात आम्ही तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खात होतो. दाऊदशी संबंधांवर काही बोलू शकत नव्हतो.