नरेंद्र मोदी जेव्हा भेटतात नरेंद्र मोदींना...
By Admin | Published: April 20, 2016 05:16 PM2016-04-20T17:16:00+5:302016-04-20T17:16:00+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा त्यांचा मेणाचा पुतळा बघितला त्यावेळी मादाम तुसाँची टीम अतुलनीय काम करते असे प्रशंसोद्गार त्यांच्या मुखातून उमटले
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 20 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा त्यांचा मेणाचा पुतळा बघितला त्यावेळी मादाम तुसाँची टीम अतुलनीय काम करते असे प्रशंसोद्गार त्यांच्या मुखातून उमटले. मोदींच्या पुतळ्याचं काम पूर्ण झालं असून तो लंडनला रवाना झाला आहे आणि 28 एप्रिल रोजी तो संग्रहालयात दाखल होईल. त्यापूर्वी मोदींनी पूर्ण झालेला पुतळा बघितला आणि ब्रह्मदेव जे काम नेहमी करतो ते निर्माणाचं काम या कलाकारांनी केलंय असं ते म्हणाले.
लंडनखेरीज सिंगापूर, हाँगकाँग आणि बँकॉकमधल्या मादाम तुसाँच्या संग्रहालयामध्ये मोदींचे मेणाचे पुतळे बसवण्यात येणार आहेत.
पुतळ्याच्याच अवतारात, म्हणजे त्याच रंगाच्या कपड्यांमध्ये मोदी पुतळ्याशेजारी उभे राहिले आणि त्यांनी फोटोही काढून घेतला. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन, जर्मनीच्या चॅन्सेलर अंजेला मर्केल, फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्किस होलांद, महात्मा गांधी आणि विन्स्टन चर्चिल यांच्या पंक्तीत मोदींचा पुतळा ठेवण्यात येणार आहे.
लोकांनी बघण्याआधी मोदींनी स्वत:चा पुतळा बघावा हा दुर्मिळ योगायोग असल्याची भावना मादाम तुसाँ म्युझियमचे जनरल मॅमेजर एडवर्ड फुलर यांनी व्यक्त केली आहे.
मोदींच्या प्रत्येक पुतळ्याच्या निर्मितीचा खर्च दीड लाख ब्रिटिश पौंड असून कलाकारांनी या पुतळ्यांच्या निर्मितीसाठी चार महिने घेतले आहेत.