Jayant Patil: "राष्ट्रवादीवर जेव्हा टीका होते, त्याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 01:45 PM2022-11-04T13:45:43+5:302022-11-04T13:46:30+5:30

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे विधान

When NCP is criticized by many it means we are growing says Jayant Patil | Jayant Patil: "राष्ट्रवादीवर जेव्हा टीका होते, त्याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे"

Jayant Patil: "राष्ट्रवादीवर जेव्हा टीका होते, त्याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे"

googlenewsNext

Jayant Patil, NCP: "आपल्या राष्ट्रवादी पक्षावर जेव्हा टिका होते याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे. महाराष्ट्रात हाच पक्ष आपली सत्ता धोक्यात आणू शकतो ही भीती असल्याने सत्ताधार्‍यांकडून राष्ट्रवादीवर टीका होत आहे," असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबिराला आजपासून शिर्डीत सुरुवात झाली. या शिबीरात त्यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

"राज्यात सत्ता नसताना आपण केंद्रस्थानी होतो. हल्लाबोल आंदोलन केले. पदयात्रा काढली. त्यानंतर विदर्भात बोंडअळी नुकसानग्रस्तांना मदत सरकारला द्यावी लागली. आज शेतकरी अडचणीत, अस्वस्थ शेतकरी आहे सरकार मात्र याकडे लक्ष देत नाही. शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी सरकारला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला निवेदन दिले मात्र सरकारने अद्याप ओला दुष्काळ जाहीर केला नाही," अशा शब्दात तीव्र नाराजी जयंत पाटील यांनी व्यक्त केली. आपल्या मंत्र्यांनी चांगले काम केले हे जनतेला सांगण्याची गरज आहे. आपल्या पक्षाच्या माध्यमातून झालेली कामे पोचवा ती लोकांपर्यंत जायला हवीत, असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

"शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केले, त्या बंडखोरीशी काही संबंध नाही म्हणणारे भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार बच्चू कडू हे एका फोनवर गुवाहाटीला गेले हे जाहीर सांगतात यावरून या बंडामागे कोण होतं हे लक्षात येते," असा सवालही जयंत पाटील यांनी उपस्थित केला.

Web Title: When NCP is criticized by many it means we are growing says Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.