राज्य लुटणाऱ्यांना आमचं सरकार आल्यावर जेलमध्ये टाकू; आदित्य ठाकरे यांचा इशारा

By राजू हिंगे | Published: January 21, 2024 10:38 PM2024-01-21T22:38:21+5:302024-01-21T22:38:52+5:30

आमच्या हिंदुत्वात महिलांचा सर्वोच्च सन्मान राखला जातो, बलात्काऱ्यांना फासावर लटकवले जाते असं आदित्य ठाकरे म्हणाले.

When our government comes, we will put those who looted the state in jail; Aditya Thackeray's warning to BJP, Eknath Shinde Group | राज्य लुटणाऱ्यांना आमचं सरकार आल्यावर जेलमध्ये टाकू; आदित्य ठाकरे यांचा इशारा

राज्य लुटणाऱ्यांना आमचं सरकार आल्यावर जेलमध्ये टाकू; आदित्य ठाकरे यांचा इशारा

पुणे: गुजरातच्या आदेशावरून महाराष्ट्राची लूट करणाऱ्यांची आमचं सरकार आल्यानंतर सखोल चौकशी करून  दोषीना जेलमध्ये टाकू  असा इशारा  युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी  दिला आहे. दिल्लीश्वर महाशक्ती वार करत असतानाही, महाराष्ट्राची माती लढण्याची प्रेरणा देत असून, महाराष्ट्राला आडवे जाणाऱ्यांना आडवे केल्याशिवाय राहणार नाही. असेही त्यांनी सांगितले.

युवासेनेतर्फे सणस मैदानावर आयोजित 'युवा खेळ समिट' महोत्सवाचा समारोप आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला.त्यावेळी ते जाहीर सभेत बोलत होते.  आमच्या हिंदुत्वात महिलांचा सर्वोच्च सन्मान राखून बलात्काऱ्यांना फासावर चढविले जाते, परंतु, भाजपचे हिंदुत्व हे बलात्काऱ्यांचा सत्कार करते,’ अशी टीका करून आदित्य ठाकरे म्हणाले. भाजप राममंदिराचा मुद्दा विसरून गेली होती, त्यावेळी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरीवरील मूठभर माती अयोध्येत नेऊन ‘पहिले मंदिर फिर सरकार’ हा निर्धार केला होता. ‘रघुकुल रीत’ प्रमाणे सरकार आल्यावर शेतकरी कर्जमुक्तीचा निर्णय घेतला, करोना संकटकाळात खरी आकडेवारी दाखवली. आमच्या हिंदुत्वात महिलांचा सर्वोच्च सन्मान राखला जातो, बलात्काऱ्यांना फासावर लटकवले जाते, भाजपच्या हिंदुत्वात पॅरोलवरील बलात्काऱ्यांचा सत्कार केला जातो,’ असेही ते म्हणाले. 

जनतेचा मताचा आवाज ऐकू जाईल

‘पुणे शहरात दोन वर्षे प्रशासक राज असून, दररोज कचरा उचलला जात नाही, रस्त्यांवर खड्डे आहेत, पाणी तुंबत आहे, नदीकाठ विकसन प्रकल्पाच्या राडारोड्यामुळे नदीपात्र उद्‌ध्वस्त होत आहे. नागरिकांचा आवाज ऐकला जात नाही. दावोसमध्ये मजा मारणाऱ्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना हा आवाज ऐकू जाणार नाही, परंतु, जनतेच्या मतांचा खणखणीत आवाज ऐकू जाईल,’ असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले

तेव्हाच्या अर्थमंत्र्याबाबत तक्रार, आता अर्थमंत्री कोण?

‘अर्थमंत्री फंड देत नाहीत, अशी तक्रार मिंधे गटाचे आमदार करत होते, आता अर्थमंत्री कोण आहेत, हे चाळीस गद्दारांनी सांगावे,’ असा सवाल आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आमदारांना केला, तर ‘भाजपकडे असणारे पालकमंत्रीपद आता कोणाकडे आहे,’ असा प्रश्न भाजपच्या कार्यकर्त्यांना केला. ‘महाविकास आघाडीने प्रस्तावित केलेले पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ रद्द करण्यात आले. लोहगाव विमानतळाची नवीन इमारत चार महिन्यांपासून बांधून तयार असूनही, खोके सरकारला उद्घाटनासाठी वेळ मिळत नाही,’ असा टोलाही त्यांनी लगावला. 

पालकमंत्री पद तुमचं गेलं. तुम्ही काय केलं? 

जे पालकमंत्री पद तुम्ही भांडून, लढून मिळवलं होतं ते पालकमंत्री पद तुमचं गेलं. तुम्ही काय केलं? या बददल भाजपच्या कार्यकर्त्यांना काय वाटते असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. यावेळी पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहिर ,  सहसंपर्कप्रमुख  आदित्य  शिरोडकर,   माजी मंत्री  शशिकांत सुतार,माजी आमदार चंद्रकांत मोकाटे,महादेव बाबर ,शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकूडे, माजी गटनेते पृथ्वीराज सुतार, माजी नगरसेवक विशाल धनवडे, संजय भोसले,  आदी उपस्थित होते.

 

Web Title: When our government comes, we will put those who looted the state in jail; Aditya Thackeray's warning to BJP, Eknath Shinde Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.